Wednesday, 21 January 2026

इयत्ता : दुसरी - गणित : शंकू, इष्टिकाचिती, दंडगोल, गोल

⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : शंकू, इष्टिकाचिती, दंडगोल, गोल*
****************************
प्र.१) खालीलपैकी कोणत्या वस्तूचा आकार गोल असतो?
१) टेबल
२) कपाट
३) चेंडू
४) पुस्तक

प्र.२) आइस्क्रीम चा कोन साधारणपणे कोणत्या आकारा असतो ?
१) गोल
२) चौरस
३) शंकू
४) आयत

प्र.३) इष्टिकाचिती म्हणजे खालीलपैकी कोणता आकार ?
१) त्रिकोण
२) विटेचा आकार
३) गोल आकार
४) वर्तुळ

प्र.४) गॅस सिलेंडर चा आकार कोणता असतो ?
१) गोल
२) शंकू
३) दंडगोल
४) इष्टिकाचिती

प्र.५) डब्याचा आकार कोणता ?
१) गोल
२) शंकू
३) इष्टिकाचिती
४) दंडगोल

प्र.६) खालीलपैकी कोणत्या आकृतीला फक्त वक्र पृष्ठभाग असतो?
१) दंडगोल
२) शंकू
३) गोल
४) इष्टिकाचिती

प्र.७) दंडगोलाच्या वरचा व तळाचा पृष्ठभाग कसा असतो?
१) वक्र
२) त्रिकोणी
३) सपाट
४) शंकूसारखा

प्र.८) इष्टिकाचितीला किती कोपरे असतात?
१) चार
२) सहा
३) आठ
४) बारा

प्र.९) शंकूला किती कडा असतात?
१) शून्य
२) एक
३) दोन
४) चार

प्र.१०) खालीलपैकी कोणता आकार साबणाच्या वडी सारखा दिसतो ?
१) गोल
२) शंकू
३) दंडगोल
४) इष्टिकाचिती

No comments:

Post a Comment