इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे वाक्प्रचार

इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे वाक्प्रचार


दंग असणे – गुंग होणे

हरखून जाणे – गुंग होणे

मग्न असणे – गुंग असणे


काळजात डसणे – मनाला लागणे


तरातरा चालणे – भराभर चालणे


डोळे झरणे – रडणे

मन भरून येणे – रडणे

डोळे पाणावणे – डोळ्यात पाणी येणे

डोळ्यात पाणी येणे – रडू येणे

गळा भरून येणे – रडायला येणे


आमंत्रित करणे – बोलावणे

स्वागत करणे – सन्मानाने बोलणे


प्रसन्न होणे – आनंदी होणे

खूप आनंद वाटणे – प्रसन्न वाटणे

सुखावणे – आनंद होणे


बेत फुकट जाणे – नियोजन बिघडणे


धूम ठोकणे – वेगाने पळणे

पळ काढणे – पळून जाणे

धूम ठोकणे – पळून जाणे / वेगाने धावणे

उधळणे – बेफाम होऊन पळणे


आश्चर्यचकित होणे – खूप आश्चर्य वाटणे

नवल वाटणे – आश्चर्य वाटणे


कष्ट करणे – राबणे

घाम गाळणे – कष्ट करणे


दृष्टीस पडणे – दिसणे


गुजगोष्टी करणे – गप्पागोष्टी करणे


सैर करणे – सफर करणे


स्वार होणे – बसणे


कौतुक करणे – शाब्बासकी देणे

तारीफ करणे – कौतुक करणे

शाबासकी देणे – कौतुक करणे


तारीफ करणे – कौतुक करणे


माफी मागणे – क्षमा मागणे


युक्ती करणे – कल्पकता वापरणे


गट्टी जमणे – मैत्री जमणे

बिलगणे – मिठी मारणे


आगमन होणे – येणे

चाहूल लागणे – येण्याची सूचना मिळणे


संदेश आणणे – निरोप आणणे


सांगता होणे – शेवट होणे


छंद लागणे – आवड लागणे

गोडी लावणे – आवड निर्माण करणे


आडवे होणे – झोपणे


आज्ञा पाळणे – सांगितलेले काम ऐकणे


कुरवाळणे – प्रेमाने हात फिरवणे

माया करणे – प्रेम करणे


धमाल करणे – गंमती जमती करणे

मज्जा वाटणे – गंमत वाटणे


जाणून घेणे – समजून घेणे


समाजकार्य करणे – समाजासाठी कार्य करणे


सोसाट्याचा वारा – वेगाने वाहणारा वारा


पाठलाग करणे – मागे मागे जाणे


छळ करणे – त्रास देणे


शरण येणे – आश्रय मागणे


हिरमुसणे – दुःखी होणे


धुमाकूळ घालणे – गोंधळ घालणे


शांत शांत वाटणे – गप्प गप्प होणे


हूरहूर वाटणे – काळजी वाटणे

No comments:

Post a Comment