Saturday, 25 April 2026
संभाव्य 50 प्रश्न विषय बुद्धिमत्ता
परीक्षेला सामोरे जाताना: विद्यार्थी आणि पालकांसाठी 'यशवंत प्रश्नमाला' खास मार्गदर्शन
*परीक्षेला सामोरे जाताना: विद्यार्थी आणि पालकांसाठी 'यशवंत प्रश्नमाला' खास मार्गदर्शन*
नमस्कार विद्यार्थी मित्रहो आणि आदरणीय पालक, उद्या परीक्षेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या दृष्टीने आजची पूर्वतयारी ही केवळ अभ्यासाची नसून ती शारीरिक आणि मानसिक नियोजनाची सुद्धा आहे. उद्याचा दिवस शांततेत जावा यासाठी आज वेळेवर जेवण करणे, हलका आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेच्या दिवशी सकाळी दूध-बिस्किटांसारखा अल्पोपहार टाळावा. घरून व्यवस्थित जेवण करूनच ९:३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहोचावे; कारण रिकाम्या पोटी पेपर लिहिताना एकाग्रता होत नाही. मात्र, जेवतानाही पोटाला तडा जाईल इतके जेवू नये, कारण अन्नाच्या पचनासाठी मेंदूचा रक्तप्रवाह पोटाकडे जास्त वळल्यास डोकं चालवण्यात अडचणी येऊ शकतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपले हॉल तिकीट सोबत ठेवणे अनिवार्य आहे. पेपरच्या मधल्या सुट्टीत मुलांनी मैदानात धावपळ करणे किंवा एकमेकांना ढकलणे टाळावे, कारण सध्या उष्णता प्रचंड आहे. अशा वातावरणात जास्त हालचाल केल्यास अस्वस्थता वाढून पेपरवर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. पालकांनीही मधल्या दीड तासाच्या सुट्टीत मुलांना बाहेर नेण्यापेक्षा केंद्रावरच शांत बसवणे हिताचे ठरेल. पहिला पेपर झाल्यानंतर त्याबद्दल कोणतीही चर्चा न करता, पालकांनी मुलांकडून प्रश्नपत्रिका व कार्बन कॉपी शांतपणे जमा करून घ्यावी आणि दुसऱ्या पेपरसाठी त्यांना प्रोत्साहित करावे.
प्रत्यक्ष पेपर सोडवताना प्रश्न शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचण्याची सवय ठेवा. महत्त्वाच्या शब्दांखाली अधोरेखित करणे, कच्चे काम पेपरवरच करणे आणि सर्व पर्याय वाचून मगच उत्तर निश्चित करणे या लहान पण महत्त्वाच्या गोष्टी यशासाठी कारणीभूत ठरतात. उत्तरपत्रिकेवर गोल करताना निळ्या किंवा काळ्या बॉल पेनचाच वापर करावा आणि गोल बाहेरून आत या पद्धतीने रंगवावा. आपली उत्तरपत्रिका ही आपल्या नावासह येते, त्यामुळे त्यावर परीक्षकांच्या सूचनेशिवाय काहीही लिहू नका. पाण्याची बाटली जवळ ठेवा, पण पाणी पिताना उत्तरपत्रिकेवर सांडणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण खराब झालेली उत्तरपत्रिका बदलून मिळत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याचा संच वेगळा असल्याने दुसऱ्याचे पाहून लिहिण्याचा प्रयत्न करू नका, त्याने तुमचे नुकसान होऊ शकते.
साडेतीन वाजता पेपर सुटल्यानंतर पालकांनी मुलांना घरी नेताना सर्व कागदपत्रे जपून ठेवावीत, कारण निकाल पाहताना त्याची गरज लागते. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच नवोदय परीक्षेच्या तयारीला लागणे आवश्यक आहे. मुलांच्या अभ्यासाची जी गोडी निर्माण झाली आहे, त्यात खंड पडू न देता पालकांनीही जागरूक राहावे. *'यशवंत प्रश्नमाला'* नेहमीच तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सोबत आहे. या सर्व सूचनांचे पालन केल्यास तुमची परीक्षा नक्कीच सुलभ जाईल. *'यशवंत प्रश्नमाला'* परिवारातर्फे तुम्हा सर्व परीक्षार्थींना उज्ज्वल यशासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! तुमचा पेपर नक्कीच छान जाईल, स्वतःवर विश्वास ठेवा.
Friday, 24 April 2026
गणित विषयातील संभाव्य 50 प्रश्न
⏫ यशवंत प्रश्नमाला
गणित विषयातील संभाव्य ५० प्रश्न (इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती)
Sunday, 19 April 2026
इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव मराठी गणित सराव 12
⏫ यशवंत प्रश्नमाला - सराव 12
इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा (मराठी व गणित)
इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव 12
⏫ यशवंत प्रश्नमाला - सराव 12
इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय: इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी
