समानार्थी शब्द उत्तर सूची (स्पष्टीकरणासह)

 १) सुर्य

अचूक पर्याय: ४) शशांक

स्पष्टीकरण: दिनकर, भास्कर आणि रवि हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत, तर शशांक म्हणजे चंद्र — त्यामुळे तो समानार्थी नाही.


२) पाऊस

अचूक पर्याय: ३) मेघ 

स्पष्टीकरण: वर्षा, वृष्टी आणि वरुण हे पावसाचे समानार्थी, मेघ म्हणजे ढग, त्यामुळे तो समानार्थी नाही.


३) पृथ्वी

अचूक पर्याय: ३) आकाश

स्पष्टीकरण: धरती, भूमी, वसुंधरा हे सर्व पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत; आकाश वेगळा आहे.


४) नदी

अचूक पर्याय: २) तरणी

स्पष्टीकरण: सरिता, तटिनी, तरंगिणी हे नदीचे समानार्थी आहेत; पण तरणी म्हणजे होडी — त्यामुळे समानार्थी नाही.


५) नवरा

अचूक पर्याय :४) विधू

स्पष्टीकरण: : नाथ, पती, धव  हे शब्द ‘नवरा’ या अर्थाशी संबंधित आहेत; पण विधू म्हणजे ‘चंद्र’ — तो वेगळा आहे.


६) विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे वचन पाळले.

अचूक पर्याय: २) आदेश

स्पष्टीकरण: येथे वचन म्हणजे सांगितलेली गोष्ट किंवा आदेश. त्यामुळे समानार्थी शब्द ‘आदेश’ योग्य आहे.


७) त्याने नदीत उडी मारली.

अचूक पर्याय: १) जलवाहिनी

स्पष्टीकरण: नदीला समानार्थी शब्द - जलवाहिनी 


८) शेतात सुंदर फुले फुलली होती.

अचूक पर्याय: १) कुसुमे

स्पष्टीकरण: ‘कुसुम’ हा ‘फुला’चा समानार्थी शब्द आहे; त्यामुळे ‘कुसुमे’ योग्य उत्तर.


९) रात्र

अचूक पर्याय: २) निशा

स्पष्टीकरण: ‘निशा’ हा ‘रात्र’ या शब्दाचा समानार्थी आहे. दिवस, प्रभात, प्रभा हे सकाळ व प्रकाशाशी संबंधित शब्द आहेत.


१०) वारा

अचूक पर्याय: १) पवन

स्पष्टीकरण: ‘पवन’ हा ‘वारा’चा अचूक समानार्थी शब्द आहे. जल म्हणजे पाणी, धूर म्हणजे धुके, आणि उष्ण

ता म्हणजे तापमान — हे वेगळे अर्थ आहेत.

No comments:

Post a Comment