Thursday, 21 August 2025

मराठी - उद्देश व विधेय

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी - उद्देश व विधेय*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्र. १) खालील वाक्यातील उद्देश ओळखून त्याचा योग्य पर्याय निवडा.

राम बागेत फिरत होता.

१) राम

२) बागेत

३) फिरत

४) होता


प्र. २) खालील वाक्यातील उद्देश ओळखा.

शेतकरी शेतात काम करत आहे.

१) शेतकरी

२) शेतात

३) काम

४) करत आहे


प्र. ३) खालील वाक्यातील उद्देश ओळखा.

पक्षी झाडावर बसले होते.

१) पक्षी

२) झाडावर

३) बसले

४) होते


प्र. ४) खालील वाक्यातील उद्देश ओळखा.

आईने मला गरम भाकरी दिली.

१) आईने

२) मला

३) भाकरी

४) गरम


प्र. ५) खालील वाक्यातील उद्देश ओळखा.

विठ्ठल मंदिरात गेला.

१) मंदिरात

२) गेला

३) विठ्ठल

४) मंदिर


प्र. ६) खालील वाक्यातील विधेय ओळखा.

सीमा शाळेत शिकत आहे.

१) शिकत आहे

२) शाळेत शिकत आहे

३) सीमा शिकत आहे

४) शाळेत


प्र. ७) खालील वाक्यातील विधेय ओळखा.

मी उद्या पुण्याला जाणार आहे.

१) पुण्याला जाणार आहे

२) उद्या जाणार आहे

३) मी जाणार आहे

४) उद्या पुण्याला जाणार आहे


प्र. ८) खालील वाक्यातील विधेय ओळखा.

मुलं मैदानात खेळत होती.

१) मुलं खेळत होती

२) खेळत होती

३) मैदानात खेळत होती

४) मुलं मैदानात


प्र. ९) खालील वाक्यातील विधेय ओळखा.

तो दुपारी झोपला होता.

१) दुपारी झोपला होता

२) झोपला होता

३) तो झोपला होता

४) दुपारी होता


प्र. १०) खालील वाक्यातील विधेय ओळखा.

वडील दिवसभर काम करतात.

१) काम करतात

२) दिवसभर करतात

३) दिवसभर काम करतात

४) वडील काम करतात

No comments:

Post a Comment