✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *बुद्धिमत्ता - नातेसंबंध*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
प्रश्न १) एका मुलीकडे पाहून अरुण म्हणाला, "ती माझ्या आईच्या मुलीची बहीण आहे." तर ती मुलगी अरुणची कोण?
१) बहीण
२) चुलतबहिण
३) मावसबहिण
४) आत्या
प्रश्न २) रोहनच्या आईच्या भावाची मुलगी कविता आहे. तर कविता व रोहन यांचे नाते कोणते?
१) आतेबहिण
२) मामेबहिण
३) मावसबहिण
४) चुलतबहिण
प्रश्न ३) सुनीलच्या वडिलांची बहीण ही राजेशची आई आहे. तर सुनील व राजेश यांचे नाते कोणते?
१) मावसुभाऊ
२) मामेभाऊ
३) आतेभाऊ
४) चुलतभाऊ
प्रश्न ४) एका स्त्रीकडे पाहून सीमा म्हणाली, "ती माझ्या पतीच्या बहिणीची आई आहे." तर ती स्त्री सीमेशी कोण?
१) सासू
२) मावशी
३) काकी
४) आत्या
प्रश्न ५) माझ्या आईच्या भावाच्या मुलाच्या बहिणीचे माझ्याशी नाते कोणते?
१) मामी
२) बहीण
३) मामेबहीण
४) आत्या
प्रश्न ६) रमेशने एका मुलाकडे बोट दाखवत सांगितले, "तो माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलीचा मुलगा आहे." तर तो मुलगा रमेशचा कोण?
१) मुलगा
२) भाऊ
३) पुतण्या
४) भाचा
प्रश्न ७) संजयच्या मुलीची आई व सचिनच्या मुलाची आई या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. तर संजयची मुलगी व सचिनचा मुलगा यांचे नाते कोणते?
१) आतेभाऊ-बहिण
२) मामेभाऊ-बहिण
३) मावसभाऊ-बहिण
४) चुलतभाऊ-बहिण
प्रश्न ८) एका मुलाकडे बोट दाखवत रमा म्हणाली, "तो माझ्या आईच्या वडिलांचा नातू आहे." तर तो मुलगा रमाचा कोण?
१) चुलतभाऊ
२) मावसभाऊ
३) भाऊ
४) सर्व पर्याय चुकीचे
प्रश्न ९) सुनीलच्या पत्नीची मुलगी अंजली आहे. तर अंजली सुनीलशी काय लागते?
१) बहीण
२) पुतणी
३) मुलगी
४) मावसबहिण
प्रश्न १०) एका दांपत्याला दोन मुलगे व दोन मुली आहेत. त्यातील एका मुलीचे लग्न होऊन तिला एक मूल झाले. कुटुंबात एकूण किती सदस्य असतील?
१) ६
२) ७
३) ५
४) ९
No comments:
Post a Comment