साप्ताहिक चाचणी क्रमांक 15 उत्तरसूची

१) नाशिक : द्राक्षे :: घोलवड : ?

अचूक पर्याय: चिकू

स्पष्टीकरण: घोलवड हे चिकूसाठी ओळखले जाते.


२) वाघाची : डरकाळी :: हत्तीचे : ?

अचूक पर्याय: चित्कारणे

स्पष्टीकरण: हत्तीचा आवाज चित्कार असा वर्णन केला जातो.


३) मका : कणीस :: कापूस : ?

अचूक पर्याय: बोंड

स्पष्टीकरण: कापसाचे बोंड असते, जसे मक्याचे कणीस.


४) नारळ : खोबरेल तेल :: ऊस : ?

अचूक पर्याय: काकवी

स्पष्टीकरण: उसापासून काकवी तयार होते.


५) मध्यप्रदेश : बाफला लापशी :: गुजरात : ?

अचूक पर्याय: पर्याय १ व ३ बरोबर

स्पष्टीकरण:  गुजरात मध्ये ढोकळा आणि ठेपला हे पदार्थ प्रसिद्ध आहेत. 


६) कवी : कवयित्री :: उंट : ?

अचूक पर्याय: उंटणी

स्पष्टीकरण: उंटाच्या मादीला सांडणी असे म्हणतात.


७) सह्याद्री : गोदावरी :: सातपुडा : ?

अचूक पर्याय: तापी

स्पष्टीकरण: तापी नदी सातपुडा परिसरातून वाहते.


८) आंबा : फळ :: बटाटा : ?

अचूक पर्याय: मूळ

स्पष्टीकरण: बटाटा जमिनीत वाढणारे मूळ आहे.


९) भावार्थदीपिका : संत ज्ञानेश्वर :: दासबोध : ?

अचूक पर्याय: समर्थ रामदास

स्पष्टीकरण: दासबोध हे समर्थ रामदास यांनी लिहिले आहे.


१०) ५० वर्षे : सुवर्णमहोत्सव :: ? वर्षे : हिरकमहोत्सव

अचूक पर्याय: ६९

स्पष्टीकरण: ६० वर्षांचा उत्सव हिरकमहोत्सव.


११) झुंबड : उतारूंची :: ? : भक्तांची गर्दी

अचूक पर्याय: मांदियाळी

स्पष्टीकरण: भक्तांची गर्दी म्हणजे मांदियाळी.


۱۲) अश्व : वारु :: आकाश : ?

अचूक पर्याय: व्योम

स्पष्टीकरण: आकाशाला व्योम हे समानार्थी नाव आहे.


१३) बेडूक : त्वचा :: मासे : ?

अचूक पर्याय: कल्ले

स्पष्टीकरण: माशांचा श्वसन अवयव म्हणजे कल्ले.


१४) सूप : पाखडणे :: तिफन : ?

अचूक पर्याय: नांगरणे

स्पष्टीकरण: तिफन हे शेतीची मशागत करणारे अवजार आहे. याने नांगरणी केली जाते.


१५) शिरोपोकळी : मेंदू :: वक्षपोकळी : ?

अचूक पर्याय: फुफ्फुस

स्पष्टीकरण: वक्षपोकळीत फुफ्फुसे असतात.


१६) श्वसन : फुप्फुस :: रक्ताभिसरण : ?

अचूक पर्याय: हृदय

स्पष्टीकरण: रक्ताभिसरणाची मुख्य क्रिया हृदय करते.


१७) तुकडोजी महाराज : राष्ट्रसंत :: शाहू महाराज : ?

अचूक पर्याय: राजर्षी

स्पष्टीकरण: शाहू महाराजांना राजर्षी ही उपमा दिली जाते.


१८) भारत : दिल्ली :: महाराष्ट्र : ?

अचूक पर्याय: मुंबई

स्पष्टीकरण: महाराष्ट्राची राजधानी मुंबई.


१९) नाशिक : मांडे :: नागपूर : ?

अचूक पर्याय: संत्राबर्फी

स्पष्टीकरण: नागपूर संत्र्यांसाठी प्रसिध्द, त्यावरून संत्राबर्फी बनते.


२०) फेब्रुवारी : जून :: ऑगस्ट : ?

अचूक पर्याय: डिसेंबर

स्पष्टीकरण: फेब्रुवारी ते जून इतकाच अंतर ऑगस्ट ते डिसेंबर.


२१) फूल : पाकळ्या :: शब्द : ?

अचूक पर्याय: अक्षरे

स्पष्टीकरण: शब्द अक्षरांनी बनतो.


२२) घुबडांचा : घुत्कार :: मधमाशांचा : ?

अचूक पर्याय: गुंजारव

स्पष्टीकरण: मधमाशा गुंजारव करतात.


२३) ना. धो. महानोर : रानकवी :: गोविंदाग्रज : ?

अचूक पर्याय: राम गणेश गडकरी

स्पष्टीकरण: गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव.


२४) कृष्णा : महाबळेश्वर :: गोदावरी : ?

अचूक पर्याय: त्र्यंबकेश्वर

स्पष्टीकरण: गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे.


२५) एप्रिल : नोव्हेंबर :: मार्च : ?

अचूक पर्याय: सप्टेंबर

स्पष्टीकरण: एप्रिलपासून नोव्हेंबर इतके अंतर मार्चपासून सप्टेंबरपर्यंत येते.

No comments:

Post a Comment