इयत्ता : दुसरी - गणित : विस्तारीत मांडणी उत्तर सूची

प्र.१)

८४ या संख्येतील अंकांची अचूक विस्तारीत मांडणी कोणती आहे?

अचूक पर्याय: ३)

स्पष्टीकरण: ८ दशक = ८० व ४ एकक = ४ म्हणून ८० + ४.


प्र.२)

५ एकक + ६ दशक = एकूण किती एकक होतात?

अचूक पर्याय: १)

स्पष्टीकरण: ६ दशक = ६० एकक, ६० + ५ = ६५ एकक.


प्र.३)

४४ या संख्येत दशक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत ही एकक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे?

अचूक पर्याय: २)

स्पष्टीकरण: दशक स्थानाची किंमत ४० व एकक स्थानाची किंमत ४. ४० ÷ ४ = १० पट.


प्र.४)

३ शतक + २ दशक + ७ एकक = कोणती संख्या तयार होते?

अचूक पर्याय: १)

स्पष्टीकरण: ३०० + २० + ७ = ३२७.


प्र.५)

६० + ९ हे कोणत्या संख्येचे विस्तारीत रूप आहे?

अचूक पर्याय: १)

स्पष्टीकरण: ६० + ९ = ६९.


प्र.६)

९२ या संख्येची अचूक विस्तारीत मांडणी कोणती आहे?

अचूक पर्याय: १)

स्पष्टीकरण: ९ दशक = ९० व २ एकक = २.


प्र.७)

५० + ६ या विस्तारीत मांडणीवरून तयार होणारी संख्या कोणती आहे?

अचूक पर्याय: १)

स्पष्टीकरण: ५० + ६ = ५६, वाचन ‘छप्पन्न’.


प्र.८)

७३ या संख्येतील दशक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे?

अचूक पर्याय: ३)

स्पष्टीकरण: ७ दशक = ७०.


प्र.९)

१०० + २० + ५ ही विस्तारीत मांडणी कोणत्या संख्येची आहे?

अचूक पर्याय: १)

स्पष्टीकरण: १०० + २० + ५ = १२५.


प्र.१०)

‘अठ्ठ्याऐंशी’ या संख्येची अचूक विस्तारीत मांडणी कोणती आहे?

अचूक पर्याय: १)

स्पष्टीकरण: अठ्ठ्याऐंशी = ८८ = ८० + ८.

No comments:

Post a Comment