करावे तसे भरावे - वाईट काम करणाऱ्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
कर नाही त्याला डर कशाला - ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाची भिती बाळगण्याचे कारण नाही.
अंगापेक्षा बोंगा मोठा - मूळ गोष्टीपेक्षा तिच्याशी संबंधित गोष्टींचा बडेजाव फार मोठा असतो.
कामापुरता मामा- गरजेपुरते गोड बोलणे
एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणात एकट्यालाच दोष देता येत नाही.
उचलली जीभ लावली टाळ्याला उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
पळसाला पाने तीनच सर्वत्र सारखीच परिस्थिती असते.
बळी तो कान पिळी - बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो.
बाप तसा बेटा- बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे.
पालथ्या घागरीवर पाणी केलेला उपदेश निष्फळ ठरणे.
आधी पोटोबा मग विठोबा आधी पोटापाण्याचा विचार करणे मग अन्य कामे करणे.
पाचामुखी परमेश्वर - बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे.
अंथरुण पाहून पाय पसरावे ऐपतीच्या मानाने खर्च करावे.
एका माळेचे मणी सर्वच सारखे.
बोलेल तो करेल काय - केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीच होऊ शकत नाही.
बड़ा घर पोकळ वासा - दिसण्यात श्रीमंती पण प्रत्यक्षात वेगळी परिस्थिती.
पाचही बोटे सारखी नसतात सर्व माणसे सारख्या स्वभावाची, कर्तृत्वाची नसतात.
प्रयत्नांती परमेश्वर कोणतीही गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा दुसऱ्याच्या अनुभवातून आपण घडा घेणे.
नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाव मोठं पण कर्तृत्व कमी प्रतीचं.
No comments:
Post a Comment