इयत्ता : दुसरी - मराठी : विरामचिन्ह उत्तरसूची

 १) “तू आज शाळेला जाणार का?”

योग्य पर्याय: २) प्रश्नचिन्ह

स्पष्टीकरण: वाक्य प्रश्न विचारते, म्हणून प्रश्नचिन्ह आहे.


२) अरे बापरे! किती मोठा आवाज झाला!

योग्य पर्याय: २) उद्‌गारचिन्ह

स्पष्टीकरण: आश्चर्य किंवा भाव व्यक्त करण्यासाठी उद्‌गारचिन्ह वापरतात.


३) खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह नाही.

आई म्हणाली, “लवकर जेवून घे.”

योग्य पर्याय: १) प्रश्नचिन्ह 

स्पष्टीकरण: दिलेले वाक्यामध्ये दुहेरी अवतरणचिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम ही विराम चिन्ह आले आहेत. प्रश्नचिन्ह आलेले नाही. 


४) पाटी, पेन्सिल, पुस्तके, खोडरबर माझ्या पिशवीत आहेत.

योग्य पर्याय: २) स्वल्पविराम आणि पूर्णविराम

स्पष्टीकरण: यादीत स्वल्पविराम आणि शेवटी पूर्णविराम आहे.


५) आज शाळेला सुट्टी आहे.

योग्य पर्याय: ३) पूर्णविराम

स्पष्टीकरण: साधे विधान असल्याने पूर्णविराम वापरला आहे.


६) “हा केक कुणी आणला?”

योग्य पर्याय: १) प्रश्नचिन्ह

स्पष्टीकरण: वाक्य प्रश्न विचारते, त्यामुळे प्रश्नचिन्ह आहे.


७) वा! तू खूप छान चित्र काढलंस!

योग्य पर्याय: ४) उद्‌गारचिन्ह

स्पष्टीकरण: कौतुक व्यक्त करण्यासाठी उद्‌गारचिन्ह वापरतात.

No comments:

Post a Comment