✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *गणित - बेरीज आणि वजाबाकी शाब्दिक मिश्र उदाहरणे*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
१) सीमाने १५२५ रुपयांचे कपडे, ८७५ रुपयांच्या चपला व ५५० रुपयांची बॅग खरेदी केली. तिने दुकानदारास ३००० रुपये दिले. तर दुकानदाराने तिला किती रुपये परत देईल?
(१) १०५
(२) ५५
(३) १५५
(४) ५०
२) एका गावाची एकूण लोकसंख्या १५७८० आहे. त्यापैकी ९७६० लोक मतदार आहेत. तर मतदार नसलेले किती लोक आहेत?
(१) ६००२
(२) ५०२०
(३) ५२००
(४) ६०२०
३) आनंदने ३२५० रुपयांचा मोबाईल, ४५० रुपयांचे कव्हर व ३०० रुपयांचे हेडफोन खरेदी केले. दुकानदाराने २५० रुपयांची सूट दिली. तर आनंदने किती रुपये दिले ?
(१) ३७०५०
(२) ३७५००
(३) ३७.५०
(४) ३७५०
४) एका शाळेत ४८५ विद्यार्थी होते. त्यापैकी ७५ विद्यार्थी शैक्षणिक सहलीला गेले नाहीत. तर किती विद्यार्थी सहलीला गेले?
(१) ४१०
(२) ४१५
(३) ४०५
(४) ४२०
५) मंगेशचा महिन्याचा पगार १५००० रुपये आहे. त्यापैकी ३५०० रुपये घरभाडे, २५०० रुपये किराणा खर्च व १५०० रुपये प्रवास खर्च झाला. उरलेली रक्कम त्याने बचत केली. तर त्याची बचत किती?
(१) ७५.००
(२) ७५५०
(३) ७५००
(४) ८५००
६) गेल्या वर्षी शाळेत २८६५ विद्यार्थी होते. यावर्षी ३२५ नवीन विद्यार्थी आले व १८० विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेले. तर यावर्षी शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
(१) ३०११
(२) ३०१०
(३) ३०१२
(४) ३०२५
७) एका ग्रंथालयात विज्ञान विषयाची ४७०, गणित विषयाची ३५६ व समाजशास्त्र विषयाची ५२९ पुस्तके आहेत. तर एकूण किती पुस्तके आहेत?
(१) १३५०
(२) १२५०
(३) १२५५
(४) १३५५
८) एका शेतकऱ्याकडे ६४० आंबे होते. त्याने ४२५ आंबे विकले, ७५ आंबे शेजाऱ्यांना दिले. तर आता त्याच्याकडे किती आंबे उरले?
(१) १४०
(२) १५०
(३) १४५
(४) १३५
९) एका गावात ९५१ घरांपैकी ३२७ घरांना गॅस कनेक्शन नाही. तर गॅस कनेक्शन असलेली घरे किती?
(१) ६२३
(२) ६२४
(३) ६१५
(४) ६२०
१०) एका पुस्तकांच्या दुकानात ७६८पुस्तके होती. सकाळी ४२९ पुस्तके विकली व दुपारी १९५ पुस्तके परत आणली. तर दुकानात आता किती पुस्तके आहेत?
(१) ५३४
(२) ५४३
(३) ५३.४
(४) ५४.३

No comments:
Post a Comment