प्रश्न १) एका रांगेत २७ विद्यार्थी आहेत. तर मधल्या विद्यार्थ्याचा क्रमांक कोणता असेल?
१) १५
२) १३
३) १२
४) १४
प्रश्न २) एका रांगेत राधा डावीकडून १० वी व उजवीकडून १५ वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत?
१) २५
२) २४
३) २३
४) २६
प्रश्न ३) एका रांगेत ३५ विद्यार्थी आहेत. डावीकडून ९ व्या क्रमांकावर उभा असलेल्या रमेशचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल?
१) २८
२) २६
३) २५
४) २७
प्रश्न ४) एका रांगेत पुढून १८ व्या व मागून १५ व्या क्रमांकावर विजय उभा आहे. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
१) ३३
२) ३२
३) ३१
४) ३४
प्रश्न ५) एका रांगेत समोरून ६ वी मुलगी व मागून ८ वा मुलगा यांच्या मध्ये १० मुले उभी आहेत. तर रांगेतील एकूण मुले किती?
१) २४
२) २५
३) २३
४) २६
प्रश्न ६) एका रांगेत २० विद्यार्थी आहेत. डावीकडून ७ वा विद्यार्थी निवडला. त्याच्या उजवीकडून कितवा क्रमांक असेल?
१) १२
२) १३
३) १४
४) १५
प्रश्न ७) संजयचा डावीकडून व उजवीकडून क्रमांक समान आहे. जर तो डावीकडून १६ वा असेल, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
१) ३०
२) ३२
३) ३३
४) ३१
प्रश्न ८) एका रांगेत समोरून ९ वी व मागून ११ वी मुलगी यांच्या मध्ये ७ मुले आहेत. तर रांगेतील एकूण विद्यार्थी किती?
१) २६
२) २७
३) २५
४) २८
प्रश्न ९) एका मैदानात कवायतीसाठी जितक्या रांगा आहेत तितकीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकूण विद्यार्थी ४९ असतील, तर एका रांगेतील मुलांची संख्या किती?
१) ९
२) ८
३) ६
४) ७
प्रश्न १०) एका रांगेत गीता डावीकडून ११ वी आहे. तिच्या मागे मिना उभी आहे. मीनापासून ९ व्या क्रमांकावर शेवटचा विद्यार्थी आहे. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
१) १९
२) २०
३) २१
४) २२

No comments:
Post a Comment