✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *बुद्धिमत्ता - दिशा*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
१) स्नेहा उत्तर दिशेकडे तोंड करून उभी आहे. तिने उजवीकडे काटकोनात वळण घेतले. आता तिची दिशा कोणती असेल?
१) पूर्व
२) पश्चिम
३) दक्षिण
४) उत्तर
२) एक व्यक्ती दक्षिणेकडे ५ कि.मी. चालत गेला. मग उजवीकडे वळून ३ कि.मी. गेला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून ५ कि.मी. गेला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल?
१) ३ कि.मी.
२) ५ कि.मी.
३) ७ कि.मी.
४) १० कि.मी.
३) सकाळी १० वाजता सूर्यप्रकाश घराच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून आत येत असेल तर घराचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
१) उत्तर
२) पूर्व
३) पश्चिम
४) दक्षिण
४) राहुल उत्तर दिशेकडे चालत आहे. त्याने सलग दोन वेळा उजवीकडे काटकोनात वळण घेतले. आता तो कोणत्या दिशेला चालत असेल?
१) दक्षिण
२) पश्चिम
३) उत्तर
४) पूर्व
५) प्रणव पूर्वेकडे पाहत आहे. त्याने प्रथम डावीकडे वळण घेतले, मग पुन्हा डावीकडे वळण घेतले, आणि नंतर उजवीकडे वळण घेतले. आता तो कोणत्या दिशेला पाहत असेल?
१) उत्तर
२) पश्चिम
३) दक्षिण
४) पूर्व
६) सकाळी सूर्याच्या दिशेला तोंड करून उभा असलेला मनोज डावीकडे वळला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
१) उत्तर
२) दक्षिण
३) पश्चिम
४) पूर्व
७) एका चौकात उभा असलेला विजय पश्चिमेकडे पाहत आहे. त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
१) उत्तर
२) पूर्व
३) दक्षिण
४) पश्चिम
८) सीमा दक्षिण दिशेला १२ मीटर चालली. नंतर उजवीकडे वळून ९ मीटर चालली. मग डावीकडे वळून ४ मीटर चालली. तर ती मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?
१) आग्नेय
२) नैऋत्य
३) ईशान्य
४) वायव्य
९) पूर्व व दक्षिण यांच्या मधली उपदिशा कोणती?
१) ईशान्य
२) वायव्य
३) आग्नेय
४) नैऋत्य
१०) रोहन दक्षिणेकडे पाहत होता. त्याने प्रथम उजवीकडे वळण घेतले, मग पुन्हा उजवीकडे वळण घेतले, आणि शेवटी डावीकडे वळण घेतले. आता तो कोणत्या दिशेला पाहत असेल?
१) पश्चिम
२) उत्तर
३) पूर्व
४) दक्षिण

No comments:
Post a Comment