Tuesday, 14 October 2025

गणित - परिमिती

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - परिमिती*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) एका चौरसाची परिमिती ४० सेमी आहे. तर त्या चौरसाच्या एका बाजूची लांबी किती असेल?

१) ८ सेमी

२) १० सेमी

३) १२ सेमी

४) १५ सेमी


२) एका आयताची लांबी २५ सेमी व रुंदी १५ सेमी आहे. तर त्या आयताची परिमिती किती?

१) ४० सेमी

२) ५० सेमी

३) ६० सेमी

४) ८० सेमी


३) एका समभुज त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी २० सेमी आहे. त्याची परिमिती किती असेल?

१) २० सेमी

२) ४० सेमी

३) ५० सेमी

४) ६० सेमी


४) एका आयताकृती शेताची लांबी ५० मीटर आणि रुंदी ३० मीटर आहे. शेताभोवती एक फेरी मारल्यास किती अंतर चालावे लागेल?

१) ६० मी.

२) ८० मी.

३) १०० मी.

४) १६० मी.


५) १५ सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या भोवती दोन पदरी कुंपण लावायचे असल्यास किती सेमी तार लागेल?

१) १२० सेमी

२) ६० सेमी

३) ३० सेमी

४) १५० सेमी


६) एका आयताची लांबी ३२ सेमी आणि परिमिती १०० सेमी आहे. तर त्याची रुंदी किती असेल?

१) १६ सेमी

२) १८ सेमी

३) २० सेमी

४) ३४ सेमी


७) एका त्रिकोणाच्या तीन बाजू अनुक्रमे ८ सेमी, ९ सेमी आणि १० सेमी आहेत. तर त्या त्रिकोणाची परिमिती किती?

१) २७ सेमी

२) २६ सेमी

३) २८ सेमी

४) ३० सेमी


८) २४ सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे दोन समान भाग केल्यास एका भागाची परिमिती किती होईल?

१) २४ सेमी

२) २० सेमी

३) १८ सेमी

४) १६ सेमी


९) एका मैदानाची लांबी ४५ मी. व रुंदी २५ मी. आहे. त्या मैदानाभोवती तीन वेळा फेरी मारल्यास एकूण किती अंतर पार केले जाईल?

१) ३५० मी.

२) ४२० मी.

३) ४६० मी.

४) ५२० मी.


१०) ३६ सेमी परिमिती असलेल्या चौरसाचा परिघ दुप्पट केल्यास नवीन आकृतीची परिमिती किती होईल?

१) ७२ सेमी

२) ३६ सेमी

३) ४८ सेमी

४) ९० सेमी

No comments:

Post a Comment