Tuesday, 7 October 2025

गणित - आयत त्रिकोण व चौरस बाजू शिरोबिंदू कोन

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - आयत त्रिकोण व चौरस बाजू शिरोबिंदू कोन*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्रश्न १) खालीलपैकी कोणत्या आकृतीत समोरासमोरील व लगतच्या बाजू समान असू शकतात ?

१) आयत

२) चौरस

३) समांतर चतुर्भुज

४) त्रिकोण


प्रश्न २) कोणत्या आकृतीचे समोरासमोरील बाजू आणि सर्व कोन समान असतात ?

१) फक्त चौरस

२) फक्त आयत

३) आयत व चौरस दोन्ही

४) आयत, चौरस व त्रिकोण


प्रश्न ३) त्रिकोणाच्या सर्व बाजू, सर्व कोन व शिरोबिंदू यांची बेरीज किती ?

१) १०

२) १२

३) १९

४) ९


प्रश्न ४) पाच बाजू बंदिस्त असणाऱ्या आकृतीला जास्तीत जास्त किती शिरोबिंदू असतात ?

१) ६

२) ८

३) ५

४) ४


प्रश्न ५) खालीलपैकी कोणत्या आकृतीत सर्व कोन ९० अंशाचे असतात आणि बाजूंची लांबी एकसमान आहे?

१) आयत

२) त्रिकोण

३) चौरस

४) आयत व चौरस दोन्ही


प्रश्न ६) समभुज त्रिकोणात किती बाजू समान असतात ?

१) १

२) २

३) ३

४) एकही नाही.


प्रश्न ७) खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

१) चौरसाचे चारही कोन काटकोन असतात.

२) चौरसाच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात.

३) चार बाजू असणाऱ्या आकृतीला चौरस म्हणतात. 

४) चौरसाला फक्त चारच शिरोबिंदू असतात.


प्रश्न ८) कोणत्या आकृतीला नेहमी तीन बाजू असतात आणि समोरासमोरील कोन वेगवेगळे असू शकतात ?

१) आयत

२) त्रिकोण

३) चौरस

४) पंचकोन


प्रश्न ९) खालीलपैकी बरोबर विधान कोणते ?

अ) आयताच्या लगतच्या बाजू असमान असतात.

ब) चौरसाच्या लगतच्या बाजू समान असतात. 


१) फक्त अ बरोबर

२) फक्त ब बरोबर

३) अ व ब दोन्ही बरोबर 

४) अ व ब दोन्ही चुकीचे


प्रश्न १०) आयताच्या सर्व बाजू, सर्व कोन व सर्व शिरोबिंदू यांची बेरीज किती ?

१) १०

२) १२

३) १६

४) २०

No comments:

Post a Comment