Tuesday, 4 November 2025

संख्याज्ञान - आंतरराष्ट्रीय देवनागरी संख्या चिन्हे - २

 

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - संख्याज्ञान आंतरराष्ट्रीय देवनागरी संख्या चिन्हे - २*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) दोन हजार पंचावन्न ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल?

१) २०५५

२) 2055

३) २0५५

४) 20५५


२) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

१) तीनशे अकरा = ३११

२) सातशे अठ्ठावन्न = ७५८

३) दोन हजार चार = २००४

४) चारशे एकवीस = ४२०१


३) 5379 या संख्येतील शतक स्थानाचा अंक देवनागरी लिपीत लिहा.

१) 7

२) ७

३) ३

४) ९


४) " सात हजार चाळीस " ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहाल?

१) ७०४०

२) 7040

३) 70४0

४) ७०४


५) " तीन हजार चारशे छप्पन " ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल?

१) ३४५६

२) 3456

३) ३4५६

४) ३४५


६) गटात न बसणारी संख्या ओळखा.

१) १००२

२) 1002

३) १००३

४) १०००२


७) तीन अंकी सर्वात मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल?

१) ९९९

२) 999

३) १००

४) ९००


८) तीन अंकी सर्वात लहान सम संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहाल?

१) १००

२) १०१

३) १०२

४) १०३


९) ८७४९ या संख्येच्या एकक स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा.

१) 8

२) 7

३) ९

४) 9


१०) "एक लाख एकवीस हजार पाचशे अकरा" ही संख्या आंतरराष्ट्रीय 

संख्याचिन्हात कशी लिहाल?

१) १21511

२) 121511

३) १२१५११

४) १२1५११


No comments:

Post a Comment