Tuesday, 9 December 2025

इयत्ता : दुसरी - मराठी : समानार्थी शब्द

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *इयत्ता : दुसरी - मराठी : समानार्थी शब्द*

****************************


प्रश्न १) पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

१) काया

२) खग

३) गृह

४) पयोधर


प्रश्न २) हात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?

१) कर

२) हस्त

३) भुजा

४) कर्ण


प्रश्न ३) डोळे याचा समानार्थी शब्द कोणता?

१) लोचन

२) मुख

३) कर्ण

४) तन


प्रश्न ४) आई या शब्दाशी समानार्थी नसलेला कोणता?

१) जननी

२) माऊली

३) जनक

४) जन्मदात्री


प्रश्न ५) रात्र याचा समानार्थी शब्द कोणता?

१) दिन

२) निशा

३) दिवस

४) प्रकाश


प्रश्न ६) ढग या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?

१) मेघ

२) अभ्र

३) पयोद

४) व्योम


प्रश्न ७) पाय याचा समानार्थी शब्द कोणता?

१) पद

२) मुख

३) काया

४) शीत


प्रश्न ८) चंद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?

१) शशी

२) सुधाकर

३) सोम

४) केसरी


प्रश्न ९) राग याचा समानार्थी शब्द कोणता?

१) रोष

२) यात्रा

३) ग्राम

४) आलय


प्रश्न १०) काम या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?

१) कार्य

२) परिश्रम

३) कष्ट

४) गिरी

No comments:

Post a Comment