✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *मराठी - मराठी भाषेत वापरले जाणारे इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
प्र. १ ते ३ साठी सूचना:
खालील मराठीत वापरले जाणारे इंग्रजी शब्द दिले आहेत. त्यांचे योग्य पर्यायी मराठी शब्द पर्यायांमधून निवडा.
१) मॉनिटर —
१) शिक्षक २) पडदा ३) दूरदर्शन ४) निरीक्षक
२) प्रोजेक्टर —
१) प्रस्तोता २) प्रतिबिंबक ३) प्रतिध्वनी ४) विस्तारक
३) मायक्रोफोन —
१) गायक २) प्रसारक ३) ध्वनीवर्धक ४) आवाज
प्रश्न ४) खालीलपैकी इंग्रजी भाषेतून न आलेला शब्द कोणता?
१) क्लास २) वाचन ३) मोटर ४) पेन
प्र. ५ ते ७ साठी सूचना:
खालील मराठी शब्दांऐवजी मराठीत वापरले जाणारे इंग्रजी शब्द पर्यायांमधून निवडा.
५) संगणक —
१) हार्डवेअर २) सिस्टिम ३) कॉम्प्युटर ४) प्रोसेसर
६) दूरदर्शन —
१) टी.व्ही. २) मोबाईल ३) स्क्रिन ४) रेडिओ
७) विद्युतपत्र —
१) मेसेज २) लेटर ३) ई-मेल ४) पोस्ट
प्रश्न ८ ) खालील शब्दांपैकी किती इंग्रजी शब्द आहेत?
(प्रोसेसर, विद्यार्थी, कॅमेरा, पत्र, बटण, स्टेशन, पेन, विज्ञान, ट्रेन, रस्ता)
१) सात २) चार ३) पाच ४) सहा
९) चुकीची जोडी ओळखा.
१) कीबोर्ड - संकेतस्थळ २) माऊस - संगणकउंदीर ३) प्रिंटर - मुद्रक ४) रेडिओ - आकाशवाणी
१०) चुकीची जोडी ओळखा.
१) इंटरनेट - जालक २) सॉफ्टवेअर - संगणकयंत्र ३) फोटो - छायाचित्र ४) मोबाईल - भ्रमणध्वनी

No comments:
Post a Comment