⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : दोन अंकी संख्या तयार करणे.*
****************************
प्र.१) ३ व ५ या अंकांपासून तयार होणारी योग्य संख्या कोणती?
१) ५३
२) ५७
३) ३८
४) ५९
प्र.२) ‘चोपन्न’ ही संख्या तयार करण्यासाठी दशक व एककस्थानी कोणते अंक येतात?
१) ५ व ४
२) ४ व ५
३) ६ व ४
४) ५ व ६
प्र.३) *६ ही संख्या तयार केली असता तिचे वाचन ‘छप्पन्न’ असे होते तर * च्या ठिकाणी कोणता अंक येईल?
१) ४
२) ५
३) ६
४) ७
प्र.४) ९ हा अंक दोन वेळा वापरल्यास खालीलपैकी कोणती संख्या तयार होईल?
१) नव्वद
२) नव्याण्णव
३) एकोणनव्वद
४) नव्व्याऐंशी
प्र.५) ७ व ४ या अंकांपासून तयार होणारी संख्या सत्तेचाळीस असल्यास त्या संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक आहे?
१) ७
२) ४
३) ५
४) ६
प्र.६) ८ व २ या अंकांपासून खालीलपैकी कोणती संख्या तयार होईल?
१) २८
२) २९
३) २७
४) २५
प्र.७) ‘पस्तीस’ या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती?
१) ६
२) ८
३) ५
४) ३
प्र.८) दशकस्थानी ९ व एककस्थानी १ असलेली संख्या कोणती?
१) ९०
२) ९२
३) ९१
४) ९९
प्र.९) दशक व एककस्थानी समान अंक असलेल्या दोन अंकी संख्या किती आहेत?
१) ८
२) ९
३) १०
४) ७
प्र.१०) ० व ६ या अंकांपासून योग्य संख्या कोणती?
१) ०६
२) ६०
३) ६६
४) १६

No comments:
Post a Comment