⏫ *यशवंत प्रश्नमाला
*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : चौथी - बुद्धिमत्ता : वय आधारित प्रश्न*
****************************
प्र. १ राहुल हा मोहनपेक्षा २० वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज ५० वर्षे आहे, तर राहुलचे वय किती?
१) २० वर्षे
२) ३० वर्षे
३) १५ वर्षे
४) १८ वर्षे
प्र. २ स्वराचे ५ वर्षांपूर्वीचे वय १५ वर्षे होते, तर तिचे आजचे वय किती?
१) १० वर्षे
२) २५ वर्षे
३) २० वर्षे
४) ३० वर्षे
प्र. ३ स्नेहलचे आजचे वय २४ वर्षे आहे, तर तिचे ७ वर्षांपूर्वीचे वय किती होते?
१) ७ वर्षे
२) १७ वर्षे
३) ३१ वर्षे
४) २४ वर्षे
प्र. ४ आदित्यचे ३ वर्षांपूर्वीचे वय १४ वर्षे होते, तर त्याचे ३ वर्षांनंतरचे वय किती असेल?
१) २० वर्षे
२) १७ वर्षे
३) ११ वर्षे
४) २१ वर्षे
प्र. ५ अनया व रिया यांच्या ४ वर्षांपूर्वीच्या वयांची बेरीज १८ वर्षे होती, तर त्यांच्या आजच्या वयांची बेरीज किती?
१) २२ वर्षे
२) १४ वर्षे
३) २६ वर्षे
४) १८ वर्षे
प्र. ६ रोहनचे आजचे वय १७ वर्षे आहे, तर त्याचे ५ वर्षांपूर्वीचे वय किती होते?
१) २२ वर्षे
२) १२ वर्षे
३) २७ वर्षे
४) १७ वर्षे
प्र. ७ सुनिताचे वय २४ वर्षे आहे. तिच्या वयाच्या पावपट वय शरयूचे आहे, तर शरयूचे वय किती?
१) ५ वर्षे
२) ६ वर्षे
३) ७ वर्षे
४) २० वर्षे
प्र. ८ सौरभचे वय ४२ वर्षे आहे. त्याच्या वयाच्या निमपट वय संजयचे आहे, तर संजयचे वय किती?
१) २१ वर्षे
२) ३५ वर्षे
३) ३२ वर्षे
४) ४२ वर्षे
प्र. ९ कोमलचे ३ वर्षांपूर्वीचे वय २४ वर्षे होते, तर आणखी ३ वर्षांनंतर तिचे वय किती होईल?
१) २१ वर्षे
२) २७ वर्षे
३) ३० वर्षे
४) २२ वर्षे
प्र. १० कार्तिक व श्वेता यांच्या २ वर्षांपूर्वीच्या वयांची बेरीज २४ वर्षे होती, तर त्यांच्या आजच्या वयांची बेरीज किती?
१) २६ वर्षे
२) २८ वर्षे
३) २२ वर्षे
४) २० वर्षे

No comments:
Post a Comment