Tuesday, 23 December 2025

इयत्ता : चौथी - गणित : वर्तुळ

 ⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *इयत्ता : चौथी - गणित : वर्तुळ*

****************************

प्र. 1 वर्तुळाला किती केंद्रबिंदू असतात?

1. एक

2. दोन

3. तीन

4. अनेक


प्र. 2 वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात?


1. व्यास

2. जीवा

3. त्रिज्या

4. परीघ


प्र. 3 एका वर्तुळाला किती त्रिज्या असू शकतात?

1. एक

2. दोन

3. ठराविक

4. अनेक


प्र. 4 वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात?

1. त्रिज्या

2. व्यास

3. जीवा

4. परीघ


प्र. 5 वर्तुळकेंद्रातून जाणारी आणि वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारी रेषा कोणती?

1. जीवा

2. त्रिज्या

3. व्यास

4. कंस


प्र. 6 व्यासाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

1. व्यास सर्वात लहान जीवा आहे

2. व्यास आणि त्रिज्या समान असतात

3. व्यास सर्वात मोठी जीवा आहे

4. व्यासाला केंद्र नसते


प्र. 7 वर्तुळाच्या वर्तुळाकार लांबीला काय म्हणतात?

1. क्षेत्रफळ

2. परीघ

3. आंतरभाग

4. बाह्यभाग


प्र. 8 वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला काय म्हणतात?

1. बाह्यभाग

2. कंस

3. परीघ

4. आंतरभाग


प्र. 9 वर्तुळाच्या बाहेर असलेल्या भागाला काय म्हणतात?

1. आंतरभाग

2. परीघ

3. बाह्यभाग

4. जीवा


प्र. 10 परीघाच्या लहान किंवा मोठ्या भागाला काय म्हणतात?

1. व्यास

2. त्रिज्या

3. वर्तुळकंस

4. जीवा

No comments:

Post a Comment