Thursday, 17 July 2025

घटक - निमंत्रणपत्र, बातमी व सूचनाफलक



⏫ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - घटक - निमंत्रणपत्र, बातमी व सूचनाफलक*

****************************

प्रश्न - खाली दिलेले निमंत्रणपत्र वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

****************************

सस्नेह निमंत्रण

आदर्श विद्यामंदिर, कोल्हापूर 

आपल्या सहकार्याने साकार झालेल्या

नवीन सुसज्ज वर्गखोलीचे उद्घाटन समारंभ

संपन्न होत आहे.


आपली मान्यवर उपस्थिती आमच्यासाठी अभिमानास्पद ठरेल.


मुख्य अतिथी:

मा. सौ. कविता पाटील (जि.प. अध्यक्षा, कोल्हापूर)


उद्घाटक:

मा. श्री. राकेश चौरे (शिक्षणाधिकारी, प्राथमिक, कोल्हापूर)


दिनांक: बुधवार, दि. २३ / ०७ / २०२५

वेळ: सकाळी ११.०० वा.

स्थळ: आदर्श विद्यामंदिर, कोल्हापूर 


विशेष आकर्षण:

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सांस्कृतिक कार्यक्रम (भजन, गीत, लघुनाटिका)

शिक्षक-पालक संवाद सत्र



आपला,

मुख्याध्यापक व शिक्षकवृंद

आदर्श विद्यामंदिर, कोल्हापूर 


************************


प्रश्न १: या निमंत्रणात कोणत्या कार्यक्रमासाठी बोलावले आहे?

(१) वार्षिक स्नेहसंमेलन

(२) वर्गखोलीचे उद्घाटन

(३) पालक मेळावा

(४) विज्ञान प्रदर्शन

---

प्रश्न २: मुख्य अतिथी कोण आहेत?

(१) मा. श्री. राकेश चौरे

(२) मा. सौ. कविता पाटील

(३) ग्रामपंचायत सदस्य

(४) शिक्षण विस्तार अधिकारी

---

प्रश्न ३: उद्घाटन कोण करतील?

(१) मा. सौ. कविता पाटील

(२) मा. श्री. राकेश चौरे

(३) शिक्षण विस्तार अधिकारी

(४) शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष

---

प्रश्न ४: उद्घाटन समारंभ कधी आहे ?

(१) बुधवार, दि. २३ / ०७ / २०२५ roji दुपारी १.०० वा

(२) बुधवार, दि. २३ / ०७ / २०२५ रोजी सकाळी १२.०० वा

(३) बुधवार, दि. २३ / ०७ / २०२५ रोजी सकाळी ११.०० वा

(४) बुधवार, दि. २४ / ०७ / २०२५ रोजी सकाळी ११.०० वा

---

प्रश्न ५: विशेष आकर्षणात कोणता कार्यक्रम नमूद केलेला नाही?

(१) सांस्कृतिक कार्यक्रम

(२) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

(३) शिक्षक-पालक संवाद सत्र

(४) विज्ञान

 प्रदर्शनी

---


✅ उत्तरसूची:


१-(२), २-(२), ३-(२), ४-(३), ५-(४), 

---



No comments:

Post a Comment