Friday, 18 July 2025

घटक - निमंत्रणपत्र, बातमी व सूचनाफलक

⏫ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - निमंत्रणपत्र, बातमी व सूचनाफलक*

****************************

पुढे दिलेली बातमी वाचा व त्यावर आधारित प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 

****************************

कोल्हापूरमध्ये ‘स्मार्ट शाळा’ उपक्रमाची सुरुवात

कोल्हापूर, ६ सप्टेंबर :- कोल्हापूर जिल्ह्यात ‘स्मार्ट शाळा’ उपक्रमाची सुरुवात शिक्षक दिनाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हा उपक्रम राबवला असून, ५० शाळांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेला संगणक, प्रोजेक्टर, डिजिटल क्लासरूम आणि इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भानुप्रताप सिंग यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शिक्षकांना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असून, पालकांचा सहभाग देखील महत्वाचा असेल. याप्रसंगी पालकमंत्री रामचंद्र माळी, शिक्षणाधिकारी श्रीराम ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

---

१) ‘स्मार्ट शाळा’ उपक्रम कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला?

१) पुणे

२) कोल्हापूर

३) सांगली

४) सोलापूर

---

२) ‘स्मार्ट शाळा’ उपक्रम कोणी सुरू केला?

१) जिल्हा परिषद, कोल्हापूर

२) जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, कोल्हापूर

३) पालकमंत्री रामचंद्र माळी, 

४) शिक्षणाधिकारी श्रीराम ढगे

---

३) कार्यक्रम कधी आयोजित करण्यात आला होता ?

१) ४ सप्टेंबर

२) ५ सप्टेंबर

३) ६ सप्टेंबर

४) माहित नाही

---

४) विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधांचा लाभ मिळणार नाहीत?

१) स्कूल व्हॅन 

२) संगणक

३) इंटरनेट सुविधा

४) वरील सर्व

---

५) कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले?

१) पालकमंत्री रामचंद्र माळी

२) शिक्षणाधिकारी श्रीराम ढगे 

३) डॉ. भानुप्रताप सिंग

४) वरील सर्व 

****************************


🏀 *अचूक उत्तरासाठी खालील लिंक वर क्लिक करा

.*


✅ उत्तर सूची


१) २

२) २

३) २

४) १

५) ३

---


No comments:

Post a Comment