✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *घटक - संख्याज्ञान - आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्या चिन्हे *
****************************
*प्रश्न - पुढे दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
१) तीनशे छप्पन्न ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल?
१) ३५६
२) 356
३) ३5६
४) 35६
---
२) खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा.
१) चार हजार पंचेचाळीस = ४०४५
२) सहा हजार दोनशे दहा = 6210
३) दोन हजार अकरा = २०११
४) आठशे साठ = ८६००
---
३) ४२८१७ या संख्येच्या दशहजारस्थानचा अंक देवनागरी लिपीत कसा लिहावा?
१) ४
२) 4
३) २
४) 2
---
४) 9086 ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहितात?
१) 9086
२) ९०८६०
३) 90८६
४) ९०८६
---
५) रोहनने दोनशे एकसष्ट पेन घेतले. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहावी?
१) २६१
२) 26१
३) २6१
४) 261
---
६) गटात न बसणारी संख्या ओळखा.
१) ४६३2
२) 4632
३) ४6३२
४) ४६३5
---
७) चार अंकी सर्वात मोठी संख्या देवनागरी संख्याचिन्हात अशी लिहितात.
१) ९०००
२) १०००
३) ९९९९
४) 9999
---
८) चार अंकी सर्वात लहान विषम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल?
१) १०००
२) 1000
३) 1001
४) १००१
---
९) ६०७०५ या संख्येच्या दशकस्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसा लिहावा?
१) ५
२) ०
३) 0
४) 7
---
१०) पन्नास हजार चौदा ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल?
१) ५००१४
२) 50014
३) ५00१४
४) 5014
---
उत्तरसूची:
१) २) 356
२) ४) आठशे साठ = ८६००
३) १) ४
४) ४) ९०८६
५) ४) 261
६) २) 4632
७) ३) ९९९९
८) ३) 1001
९) ३) 0
१०) २) 50014

No comments:
Post a Comment