संख्याज्ञान - पाच अंकी संख्यांचे वाचन लेखन, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी.
✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *घटक - संख्याज्ञान - पाच अंकी संख्यांचे वाचन लेखन, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी.*
****************************
*प्रश्न - पुढे दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
प्र.१) अ) खालील संख्या अक्षरात कशी लिहाल?
८९,०७६
(१) नव्याण्णव हजार सत्तर
(२) एक्याण्णव हजार शहात्तर
(३) एकोणनव्वद हजार शहात्तर
(४) एक्याण्णव हजार सात सहा
---
प्र.२) ब) खालील संख्या अंकात लिहा:
सव्वा बत्तीस हजार
(१) ३१२५०
(२) ३२२५०
(३) ३२०५०
(४) ३३२५०
---
प्र.३) दिलेल्या संख्येशी मिळता जुळता पर्याय ओळखा:
नव्वद हजार पाचशे दहा
(१) ९०५१०
(२) ९०५००१०
(३) ९०५०१
(४) ९५००१
---
प्र.४) अयोग्य संख्याजोडी ओळखा:
(१) २२५० = सव्वा दोन हजार
(२) २७७५० = पावणे सत्तावीस हजार
(३) ४१२५० = सव्वा एकेचाळीस हजार
(४) १५५०० = साडे पंधरा हजार
---
प्र.५) ‘पंचवीस हजार पंचवीसशे’ ही संख्या खालीलपैकी कोणती?
(१) २५२५००
(२) २५२५०
(३) २७५००
(४) २६५००
प्र.६) ४८७८९ या संख्येतील ८ या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
(१) ८८००
(२) ७९२०
(३) ७९२
(४) ७८००
---
प्र.७) (३ × १००००) + (५ × १०००) + (७ × १००) + (२ × १०) + (९) = ?
(१) ३००००+५०००+७००+२०+९
(२) ३५७२९
(३) ३५२७९
(४) पर्याय १ व २ बरोबर
---
प्र.८) ९*६* या संख्येत * च्या जागी समान अंक आहे. त्या अंकांच्या स्थानिक किंमतींचा फरक २९७ आहे. तर * च्या जागी कोणता अंक येईल?
(१) १
(२) २
(३) ३
(४) ४
---
प्र.९) सव्वा पन्नास हजार चे विस्तारीत रूप पुढीलपैकी कोणते?
(१) ५०००० + २००० + ५००
(२) ५०००० + २०० + ५०
(३) ५०००० + ५०००+ ५००
(४) ५०००० + ७०००+ ५००
---
प्र.१०) खालीलपैकी कोणत्या संख्येत ५ व ६ या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज सर्वात जास्त आहे?
(१) ६५०४२
(२) ५९६०३
(३) ६२३०५
(४) ९
०५६२
---
उत्तर सूची:
१) ३
२) २
३) १
४) २
५) ३
६) २
७) ४
८) ३
९) २
१०) १

No comments:
Post a Comment