Tuesday, 22 July 2025

लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करणे.

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - संख्याज्ञान - लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करणे.

****************************

*प्रश्न - पुढे दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

१) ०, ३, ५, ८ या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती?

१) ८५०३

२) ८५०३

३) ८३५०

४) ८५३०


२) ५, २, ० या अंकांपासून बनणारी सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती?

१) २०५

२) २५०

३) ०२५

४) ५०२


३) सर्वात लहान चार अंकी संख्या व सर्वात मोठी तीन अंकी संख्या यांचा फरक किती?

१) १

२) ९

३) १००१

४) ९०१


४) २, ३, ४ या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती?

१) २३४

२) ३२४

३) ४३२

४) २४३


५) ४, ६, ८ या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी तीन अंकी सम संख्या कोणती?

१) ८६४

२) ८४६

३) ६८४

४) ४८६


६) ०, ५, २, १ या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती?

१) १०५२

२) १०२५

३) १५०२

४) १२०५


७) खालील संख्यांपैकी अंकांची बेरीज सर्वात जास्त कोणाची आहे?

संख्यागट – ४३२५, ६५७०, ५५४५, २८१९

१) ४३२५

२) ६५७०

३) ५५५५

४) २८१९


८) ३, १, ५, ७ या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान चार अंकी विषम संख्या कोणती?

१) १३५७

२) १५३७

३) ३१५७

४) १७५३


९) ०, १, ३, ९ या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान सम संख्या कोणती?

१) १०३९

२) १०३०

३) १०९३

४) १३९०


१०) ७, ४ या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या दोन अंकी संख्येतून सर्वात लहान दोन अंकी संख्या वजा केली तर काय उत्तर येईल?

१) ३३

२) ३५

३) २७

४) १७


उत्तरसूची:

१) ४

२) १

३) १

४) ४

५) १

६) २

७) ४

८) १

९) ४

१०) ३

No comments:

Post a Comment