Tuesday, 12 August 2025

बेरीज पाच अंकी संख्यापर्यंत

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - बेरीज पाच अंकी संख्यापर्यंत*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

१) खालील मालिकेत रिकाम्या चौकटीत कोणता अंक येईल?

५६७६ □ + ३४८ = ५७२१६

१) ५

२) ६

३) ७

४) ८


२) सीमाने ८५७५ रुपयांचा किराणा आणि ६२७५ रुपयांचे कपडे खरेदी केली असतील, तर तिने एकूण किती रुपयांची खरेदी केली ?

१) १५२३०

२) १४८५०

३) १५०००

४) १६०५०


३) ८६७४ = ४३२१ + □ चौकटीत खालीलपैकी कोणती संख्या येईल ?

१) ४३४३

२) ४३६५

३) ४३६३

४) ४३५३


४) पुढीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. 

१) ३००० + ७०० = ३७००

२) २००० + ८०० = २८००

३) ४००० + ९०० = ४९००

४) ५००० + १०५ = ५१२५


५) खालीलपैकी चुकीची बेरीज कोणती?

१) २३५७ + १२३ = २४८०

२) १२०० + ७८ = १२७८

३) ४५६ + ५४४ = १०००

४) ३६७ + ६३३ = ९९९


६) साडे तेरा हजार + तीस शतक= किती?

१) साडेपंधरा हजार

२) सव्वापंधरा हजार

३) पंधरा हजार

४) साडे सोळा हजार


७) साडेपाचशे + दीडशे + अडीचशे = किती?

१) ९५०0

२) ८५०

३) १०००

४) ९५०


८) बारा हजार + बाराशे + बारा = किती?

१) १२११२

२) १३२१२

३) १२१३२

४) २४११२


९) जर एका बागेत ५८०० सफरचंदाची झाडे, ७२०० आंब्याची आणि १४०० द्राक्षाच्या झाडांची लागवड केली तर त्या बागेत लावलेल्या सर्व सफरचंदाच्या आणि सर्व आंब्याच्या झाडांची एकूण बेरीज किती ?

१) १४४००

२) ८६००

३) १३०००

४) ७२००


१०) ७०१३ + सव्वासहाशे = किती?

१) ६७८३

२) ७६८३

३) ७६३८

४) ६७३८



No comments:

Post a Comment