प्र. १) खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी येणारे योग्य विरामचिन्ह निवडा.
' आज शाळेला सुट्टी आहे '
१) प्रश्नचिन्ह
२) पूर्णविराम
३) स्वल्पविराम
४) उद्गारचिन्ह
प्र. २) खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी येणारे योग्य विरामचिन्ह निवडा.
कुठे चाललात तुम्ही
१) पूर्णविराम
२) स्वल्पविराम
३) उद्गारचिन्ह
४) प्रश्नचिन्ह
प्र. ३) खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी येणारे योग्य विरामचिन्ह निवडा.
किती गोड गाणे आहे
१) प्रश्नचिन्ह
२) उद्गारचिन्ह
३) पूर्णविराम
४) स्वल्पविराम
प्र. ४) खालीलपैकी स्वल्पविराम कोणते ?
१) :
२) ,
३) ;
४) !
प्र. ५) खालीलपैकी पूर्णविराम कोणते ?
१) .
२) ,
३) ?
४) :
प्र. ६) खालीलपैकी दुहेरी अवतरण चिन्ह कोणते ?
१) " "
२) -
३) :
४) ;
प्र. ७) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.
१) किती छान हवामान आहे,
२) किती छान हवामान आहे!
३) किती छान हवामान आहे:
४) किती छान हवामान आहे.
प्र. ८) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.
१) 'सावित्रीबाई फुले' या समाजसुधारक होत्या.
२) सावित्रीबाई फुले या समाजसुधारक होत्या.
३) सावित्रीबाई फुले या समाजसुधारक होत्या,
४) सावित्रीबाई फुले या समाजसुधारक होत्या:
प्र. ९) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.
१) अरे वा काय सुंदर खेळ झाला.
२) अरे वा! काय सुंदर खेळ झाला.
३) अरे वा काय सुंदर खेळ झाला!
४) अरे वा! काय सुंदर खेळ झाला
प्र. १०) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.
१) शाळेतील मुलांनी "जय हिंद" असा घोष दिला.
२) शाळेतील मुलांनी जय हिंद असा घोष दिला.
३) शाळेतील मुलांनी 'जय हिंद' असा घोष दिला.
४) शाळेतील मुलांनी जय हिंद, असा घोष दिला.

No comments:
Post a Comment