Tuesday, 26 August 2025

भागाकार - तीन अंकीला दोन अंकीने भागणे


✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *भागाकार (तीन अंकीला दोन अंकीने भाग)*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १ ) ९० ला ९ ने भागले असता उत्तर काय येईल?

१) १०

२) ९

३) १

४) १००


प्रश्न २ ) एका वर्गात २५० विद्यार्थी आहेत. त्यांना ५ गटांत समान विभागले तर प्रत्येक गटात किती विद्यार्थी असतील?

१) ५०

२) ४०

३) ६०

४) ३०


प्रश्न ३ ) भागाकाराच्या उदाहरणात, बाकी नेहमी भाजकापेक्षा असते.

१) जास्त

२) कमी

३) समान

४) दुप्पट


प्रश्न ४ ) एका शेतकऱ्याकडे २८० आंबे आहेत. त्याने हे आंबे ७ पेटींमध्ये समान भरले तर प्रत्येक पेटीत किती आंबे येतील ?

१) ३०

२) ४०

३) ५०

४) ३५


प्रश्न ५) ४२० ला ३ ने भागले असता येणाऱ्या भागाकारातून ३० वजा केल्यास उत्तर किती येईल ?

१) १२०

२) १००

३) ११०

४) ९०


प्रश्न ६ ) ९५ ला ३ ने भागले असता भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल ?

१) भागाकार ३१, बाकी २

२) भागाकार ३०, बाकी ५

३) भागाकार ३२, बाकी १

४) भागाकार ३१, बाकी १


प्रश्न ७ ) पुढील उदाहरणात निःशेष भाग कोणत्या पर्यायातील उदाहरणात जाईल ?

१) ४५ ÷ ७

२) ६० ÷ १०

३) ७५ ÷ ८

४) २० ÷ ३


प्रश्न ८ ) ४२० वस्तू समान १० गटांमध्ये वाटल्या, तर प्रत्येक गटात किती वस्तू येतील ?

१) ४२

२) ४०

३) १२

४) ५०


प्रश्न ९ ) भाज्य = ? X भागाकार + बाकी. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ?

१) गुणक 

२) भाजक 

३) शून्य 

४) यापैकी नाही


प्रश्न १० ) खालीलपैकी सर्वात कमी भागाकार कोणाचा येईल?

१) ८० ÷ ५

२) १०० ÷ ४

३) ९० ÷ ९

४) ५० ÷ १०


No comments:

Post a Comment