✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *मराठी व्याकरण - वचन (एकवचन-अनेकवचन)*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
प्र.१) पुढील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाचे वचन ओळखा.
"शेतकरी शेतात बैलांसह नांगरत होता."
बैलांसह
१) एकवचन
२) अनेकवचन
३) उभयवचन
४) आदरार्थी बहुवचन
प्र.२) पुढील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाचे वचन सांगा.
"विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले गुण मिळवले."
विद्यार्थ्यांनी
१) एकवचन
२) अनेकवचन
३) उभयवचन
४) आदरार्थी बहुवचन
प्र.३) "आईने मुलासाठी खेळणे आणले." या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन कोणते?
खेळणे
१) एकवचन
२) अनेकवचन
३) उभयवचन
४) आदरार्थी बहुवचन
प्र.४) खालील शब्दसमूहात विसंगत शब्द निवडा.
१) झाडे
२) पाखरे
३) माळी
४) फळे
प्र.५) खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांचे एकवचन-अनेकवचन योग्य जुळले आहे?
१) झाड – झाडी
२) फूल – फुले
३) पाणी – पाने
४) घर – घरटे
प्र.६) पुढील शब्दाचे वचन बदलून योग्य पर्याय निवडा.
"वाडा"
१) वाडा
२) वाडी
३) वाडे
४) वडे
प्र.७) "शिते" या शब्दाचे एकवचन योग्य कोणते?
१) शित
२) शिते
३) शीते
४) शीत
प्र.८) खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते?
१) मासे
२) झरे
३) फुले
४) खडू
प्र.९) पुढील पर्यायांतील वेगळा पर्याय कोणता आहे?
१) भाऊ
२) दिशा
३) पुस्तक
४) सभा
प्र.१०) पुढील पर्यायांतील वेगळा पर्याय निवडा.
१) डोळे
२) झाडे
३) घरे
४) पक्षी

No comments:
Post a Comment