Thursday, 28 August 2025

बुद्धिमत्ता - तर्कसंगती व अनुमान

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - तर्कसंगती व अनुमान*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) राजेशचे आजचे वय ३६ वर्षे आहे व त्याच्या मुलाचे वय १२ वर्षे आहे. आणखी ८ वर्षांनी त्यांच्यातील वयाचा फरक किती असेल?

१) २४ वर्षे

२) २० वर्षे

३) २८ वर्षे

४) ३० वर्षे


२) सीमा हिचे वय रवीच्या वयाच्या तिप्पट आहे. पाच वर्षांपूर्वी रवीचे वय ८ वर्षे असल्यास सीमाचे आजचे वय किती?

१) २९ वर्षे

२) ३९ वर्षे

३) ३० वर्षे

४) ३४ वर्षे


३) अजय व त्याचा भाऊ यांच्या वयांची बेरीज ४५ वर्षे आहे. ५ वर्षांनंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल?

१) ५५ वर्षे

२) ६० वर्षे

३) ४० वर्षे

४) ५० वर्षे


४) प्रिया, किरण व पूजा यांच्या आजच्या वयाची बेरीज ४८ वर्षे आहे. तर ३ वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती?

१) ३९ वर्षे

२) ४२ वर्षे

३) ४५ वर्षे

४) ३६ वर्षे


५) रोहनचे आजचे वय १८ वर्षे आहे. अमोलचे वय रोहनच्या दुप्पटीपेक्षा ६ ने कमी आहे. अमोलचे आजचे वय किती?

१) ३० वर्षे

२) ३२ वर्षे

३) २९ वर्षे

४) ३६ वर्षे


६) स्नेहा व तिच्या आईच्या वयाची बेरीज ५५ वर्षे आहे. ३ वर्षांनंतर आईचे वय ४२ वर्षे होईल. तर स्नेहाचे आजचे वय किती?

१) १२ वर्षे

२) १३ वर्षे

३) १५ वर्षे

४) १४ वर्षे


७) वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज ६८ वर्षे आहे व त्यांच्यातील फरक २८ वर्षे आहे. तर मुलाचे आजचे वय किती आहे?

१) २० वर्षे

२) २२ वर्षे

३) २१ वर्षे

४) २५ वर्षे


८) सुनीलचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा ७ ने जास्त आहे. जर आईचे आजचे वय ५० वर्षे असेल तर सुनीलचे ३ वर्षांपूर्वीचे वय किती होते?

१) २० वर्षे

२) १८ वर्षे

३) २७ वर्षे

४) २९ वर्षे


९) अनिलच्या वडिलांचे वय त्याच्या वयाच्या दुप्पट आहे. जर ४ वर्षांपूर्वी वडिलांचे वय ४४ वर्षे होते तर त्या वेळी अनिलचे वय किती होते?

१) २२ वर्षे

२) २० वर्षे

३) १८ वर्षे

४) २४ वर्षे


१०) आई व मुलीच्या वयाची बेरीज ६० वर्षे आहे. जर मुलगी आईपेक्षा २४ वर्षांनी लहान असेल तर मुलीचे आजचे वय किती?

१) १७ वर्षे

२) २० वर्षे

३) १८ वर्षे

४) १५ वर्षे





No comments:

Post a Comment