Friday, 29 August 2025

बुद्धिमत्ता - तर्कसंगती व अनुमान (तुलना)

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - तर्कसंगती व अनुमान (तुलना)*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) एका चित्रकला स्पर्धेत अमृताला सीमापेक्षा जास्त गुण मिळाले. सीमाला कविता पेक्षा कमी गुण मिळाले. कविताला अश्विनीपेक्षा जास्त गुण मिळाले. तर सर्वात कमी गुण कुणाला मिळाले ?

१) अमृता

२) सीमा

३) कविता

४) अश्विनी


२) पाच विद्यार्थ्यांच्या रांगेत प्रकाशच्या पुढे रोहन होता. रोहन व अजय यांच्या मध्ये फक्त सचिन होता. प्रकाश व रोहन यांच्यामध्ये मिलिंद होता. तर रांगेत मध्यभागी कोण असेल ?

१) रोहन

२) मिलिंद

३) अजय

४) सचिन


३) वर्गातील सर्वात ठेंगणा अनिल होता. विजय अनिलपेक्षा उंच होता पण सुनील इतका उंच नव्हता. राहुल विजयपेक्षा लहान होता. तर सर्वात उंच कोण ?

१) विजय

२) राहुल

३) सुनील

४) अनिल


४) एका गणिती क्रियेत प्रथम गुणाकार, त्यानंतर बेरीज, त्यानंतर वजाबाकी आणि शेवटी भागाकार अशी क्रिया केली. तर शेवटून दुसरी क्रिया कोणती झाली ?

१) बेरीज

२) गुणाकार

३) वजाबाकी

४) भागाकार


५) इयत्ता ४ वीच्या परीक्षेत पल्लवी अनुश्रीच्या खाली होती. अनुश्री मनिषाच्या वर पण प्राजक्ताच्या खाली होती. अमृता प्राजक्ताच्या वर होती. तर सर्वात खालचा क्रमांक कोणाचा ?

१) अनुश्री

२) पल्लवी

३) मनिषा

४) अमृता


६) कविता मीनाक्षीपेक्षा हुशार होती पण, गौरी इतकी हुशार नव्हती. गौरी व संजना पेक्षा श्वेता हुशार होती. संजना ही मीनाक्षी व कविता यांच्यापेक्षा हुशार होती. तर मध्यम हुशार कोण?

१) गौरी

२) कविता

३) संजना

४) मीनाक्षी


७) सचिन अमोलपेक्षा मोठा आहे. अमोल व नितीन समान वयाचे आहेत. सुरेश हा सचिनपेक्षा मोठा आहे. विजय हा नितीनपेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?

१) अमोल

२) विजय

३) सचिन

४) सुरेश


८) एका स्पर्धेत प्रथम स्थान वरुणने मिळवले. त्याच्या नंतर अमित होता. अमितच्या नंतर किरण होता. किरणच्या आधी सोनाली होती. तर चौथ्या क्रमांकावर कोण?

१) सोनाली

२) किरण

३) अमित

४) वरुण


९) चार भावंडांमध्ये सर्वात उंच सागर होता. रोहन सागरपेक्षा ठेंगणा पण निलेशपेक्षा उंच होता. मयूर हा रोहनपेक्षा ठेंगणा होता. तर सर्वात ठेंगणा कोण?

१) रोहन

२) मयूर

३) निलेश

४) सागर


१०) एका गणिती पद्धतीत प्रथम वजाबाकी, त्यानंतर भागाकार, त्यानंतर बेरीज आणि शेवटी गुणाकार ही क्रिया केली. तर पहिली क्रिया कोणती?

१) गुणाकार

२) वजाबाकी

३) भागाकार

४) बेरीज

No comments:

Post a Comment