Thursday, 7 August 2025

वर्गीकरण ( शब्दसंग्रह )

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - (आकलन - वर्गीकरण)*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्र.१) खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता? 

१) खिडकी

२) दरवाजा

३) खडू

४) फरशी

---

प्र.२) खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?


१) बटाटा

२) आले

३) गाजर

४) सुरण

---

प्र.३) खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?


१) पेरु

२) आंबा

३) दोडका

४) संत्री

---

प्र.४) खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?


१) सुशिलकुमार

२) साक्षी मलिक

३) योगेश्वर दत्त

४) दीपा करमरकर

---

प्र.५) खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?


१) ग्रॅम

२) लीटर

३) मीटर

४) किलोग्रॅम

---

प्र.६) खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?


१) सिंह

२) कन्या

३) धनू

४) रेवती

---

प्र.७) खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?


१) उकळणे

२) तळणे

३) भाजणे

४) गाळणे

---

प्र.८) खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?


१) मळमळ

२) खळखळ

३) टपटप

४) सळसळ

---

प्र.९) खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?


१) नांगर

२) खुरपे

३) बैल

४) मोट

---

प्र.१०) खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?


१) मराठी

२) इतिहास

३) इंग्रजी

४) हिंदी

--- 

स्पष्टीकरणासह उत्तरे :- 


१) खिडकी, दरवाजा, खडू, फरशी

उत्तर: ३) खडू

स्पष्टीकरण: खिडकी, दरवाजा, फरशी – हे घराचे भाग आहेत. पण खडू – ही शिक्षणासाठी वापरली जाणारी वस्तू आहे.

---

२) बटाटा, आले, गाजर, सुरण

उत्तर: २) आले

स्पष्टीकरण: बटाटा, गाजर, सुरण – हे सर्व खाण्याचे कंदमुळे/भाज्या आहेत. आले – मसाल्याचा पदार्थ आहे.

---

३) पेरु, आंबा, दोडका, संत्री

उत्तर: ३) दोडका

स्पष्टीकरण: पेरु, आंबा, संत्री – हे सर्व फळे आहेत. दोडका – भाजीपाला वर्गात मोडतो.

---

४) सुशिलकुमार, साक्षी मलिक, योगेश्वर दत्त, दीपा करमरकर

उत्तर: ४) दीपा करमरकर

स्पष्टीकरण: पहिले तिघेही कुस्तीपटू आहेत. दीपा करमरकर – जिम्नॅस्ट आहे.

---

५) ग्रॅम, लीटर, मीटर, किलोग्रॅम

उत्तर: २) लीटर

स्पष्टीकरण: इतर तिन्ही वजन मोजण्याची एकके आहेत. लीटर – द्रव मापनासाठी वापरले जाते.

---

६) सिंह, कन्या, धनू, रेवती

उत्तर: ४) रेवती

स्पष्टीकरण: सिंह, कन्या, धनू – राशी आहेत. रेवती – हे नक्षत्र आहे.

---

७) उकळणे, तळणे, भाजणे, गाळणे

उत्तर: ४) गाळणे

स्पष्टीकरण: उर्वरित तिन्ही कृती उष्णता वापरून केल्या जातात. गाळणे – थंड प्रक्रिया आहे.

---

८) मळमळ, खळखळ, टपटप, सळसळ

उत्तर: १) मळमळ

स्पष्टीकरण: खळखळ, टपटप, सळसळ – हे ध्वनीदर्शक शब्द आहेत. मळमळ – हा शब्द मन:स्थिती दर्शवतो. 

---

९) नांगर, खुरपे, बैल, मोट

उत्तर: ४) मोट

स्पष्टीकरण: नांगर, खुरपे, बैल – हे शेतीची शेतीची अवजारे वा प्राणी आहेत. मोट – पाणी उपसणारे यंत्र आहे.

---

१०) मराठी, इतिहास, इंग्रजी, हिंदी

उत्तर: २) इतिहास

स्पष्टीकरण: मराठी, इंग्रजी, हिंदी – भाषा आहेत. इतिहास – एक विषय आहे.

---

No comments:

Post a Comment