Tuesday, 16 September 2025

गणित - मापन (धारकता)

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - मापन - (धारकता)*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) ४७५० मिली = लीटर मिली?

१) ४ ली ७५० मिली

२) ४७ ली ५० मिली

३) ४५० ली ७५० मिली

४) ४७ ली ५०० मिली


प्रश्न २) ८२५० मिली किती?

१) ८ ली २५० मिली

२) ८२५ ली ० मिली

३) ८२ ली ५० मिली

४) ८ ली ५०० मिली


प्रश्न ३) ९००० मिली = किती लीटर?

१) ९ लीटर

२) ९० लीटर

३) ९०० लीटर

४) ९००० लीटर


प्रश्न ४) पुढीलपैकी योग्य रूपांतर ओळखा.

१) साडेसहा लीटर = ६५०० मिली

२) सव्वासात लीटर = ७७५ मिली

३) पावणे दोन लीटर = १७५० मिली

४) सव्वा तीन लीटर = ३२५० मिली


प्रश्न ५) १२ लीटर म्हणजे किती मिली?

१) १२००

२) १२०००

३) १२१०

४) १२,००००


प्रश्न ६) ८ ली ८०० मिली + ७ ली ३०० मिली = ?

१) १६ ली १०० मिली

२) १५ ली १०० मिली

३) १६ ली १००० मिली

४) १५ ली ३०० मिली


प्रश्न ७) ५०५० मिली किती?

१) ५० ली ५० मिली

२) ५ ली ५० मिली

३) ५ ली ५०० मिली

४) ५ ली ५ मिली


प्रश्न ८) चुकीचा पर्याय ओळखा.

१) २ लीटर = २००० मिली

२) साडेतीन लीटर = ३५०० मिली

३) १० लीटर = १००० मिली

४) २५० मिली = पाव लीटर


प्रश्न ९) एका शेतकऱ्याने ३ सव्वा लीटर आणि दुसऱ्याने २ सव्वा लीटर दूध दिले. दोघांनी मिळून किती दूध दिले?

१) ५ लीटर

२) ५ लीटर ५०० मिली

३) ६ लीटर

४) ६ लीटर ५०० मिली


प्रश्न १०) सव्वादहा लीटर = किती मिली?

१) १०२५ मिली

२) १०,२५० मिली

३) १२५० मिली

४) १०,०५० मिली


No comments:

Post a Comment