Wednesday, 17 September 2025

कालमापन (घड्याळ)

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *गणित - कालमापन (घड्याळ)*

****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 
****************************

प्रश्न १) सकाळी ९ वा. ४५ मि. शाळा सुरू झाली आणि दुपारी ३ वा. १५ मि. सुटली तर शाळा किती वेळ चालली?
१) ५ ता. १५ मि.
२) ५ ता. ३० मि.
३) ६ ता. ३० मि.
४) ६ ता. १५ मि.

प्रश्न २) राजू दुपारी १ वा. २० मि. घरातून निघाला व संध्याकाळी ५ वा. ५० मि. परतला. तो बाहेर किती वेळ होता?
१) ४ ता. २० मि.
२) ३ ता. ३० मि.
३) ४ ता. ३० मि.
४) ५ ता. ३० मि.

प्रश्न ३) ९ मिनिटे = ? सेकंद
१) ५४०
२) ४९०
३) ४५०
४) ५५०

प्रश्न ४) २ ता. २५ मि. + १ ता. ५० मि. = ?
१) ३ ता. ७५ मि.
२) ४ ता. १५ मि.
३) ४ ता. ०५ मि.
४) ३ ता. १५ मि.

प्रश्न ५) एक दिवसात किती मिनिटे असतात?
१) १४४०
२) १३८०
३) १६८०
४) १२४०

प्रश्न ६) २४ ताशी घड्याळाप्रमाणे २१ वा. १० मि. झाले तर १२ ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजले असतील?
१) ९ : १०
२) ८ : १०
३) ७ : १०
४) ११ : १०

प्रश्न ७) पावणे नऊ वाजता मिनिट काटा कितीवर असेल?
१) ९
२) ३
३) ६
४) ७

प्रश्न ८) रवि एका मिनिटात १५ दोरीच्या उड्या मारतो. तर १२ मिनिटांत तो किती उड्या मारील?
१) १८०
२) १६५
३) १५०
४) २००

प्रश्न ९) घड्याळात काटकोन किती वेळा होतो?
१) ११ वेळा
२) २२ वेळा
३) २ वेळा
४) ४ वेळा

प्रश्न १०) मध्यान्होतर ७ वा. ४५ मि. = ? 
१) १९ वा. ४५ मि.
२) २० वा. १५ मि.
३) २१ वा. १५ मि.
४) १८ वा. ४५ मि.

No comments:

Post a Comment