यशवंत प्रश्नमाला
💧 0
१/५
खालील संवाद काळजीपूर्वक वाचा:
"अद्वया, जान्हवी, आराध्या, राजनंदिनी मास्क लावलास ना गं ?""हो, हो गं स्वरांजली अजूनही कोरोना आहे ना. मास्क घातला नाही तर धोका होतो." अद्वया म्हणाली.
"पण आपल्याला लस मिळालीय ना?" आराध्या म्हणाली.
"लस मिळाली तरी हात धुणे आणि सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे." राजनंदिनी म्हणाली.
"माझी आई नेहमी सांगते, हात नीट धुवून जा आणि गर्दीत उभी राहू नको." जान्हवी म्हणाली.
"शाळेतही शिक्षक वारंवार सांगतात नियम पाळा म्हणून." अद्वया म्हणाली.
"हो खरंच, आपण काळजी घेतली तर आपलं आणि इतरांचं रक्षण होईल." राजनंदिनी म्हणाली.
"बरोबर आहे, चला आता नियम पाळून शाळेत जाऊ." सर्वजणी एकत्र म्हणाल्या.
इयत्ता चौथी मराठी - संवाद
लोड होत आहे...
No comments:
Post a Comment