Monday, 29 September 2025

गणित - नाणी - नोटा ( रुपये - पैसे )

 

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - नाणी - नोटा ( रुपये - पैसे )*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्रश्न १) १००० पैसे = किती रुपये ?

१) १०० रुपये

२) १ रुपया

३) १० रुपये

४) ५ रुपये


प्रश्न २) ५ रुपये = किती पैसे ?

१) ५० पैसे

२) ५००० पैसे

३) ५५ पैसे

४) ५०० पैसे


प्रश्न ३) ८ रु. ४० पैसे + ५ रु. ६० पैसे = ?

१) १४ रुपये

२) १३ रु. ५० पैसे

३) १५ रु. २० पैसे

४) १४ रु. ५० पैसे


प्रश्न ४) २५ रुपये म्हणजे किती पैसे ?

१) २५० पैसे

२) २५०० पैसे

३) २५ पैसे

४) २५००० पैसे


प्रश्न ५) १०० रुपयांमध्ये २० रु. च्या किती नोटा मिळतील ?

१) १५

२) १०

३) २०

४) ५


प्रश्न ६) राहुलकडे ५० रु. च्या ४ नोटा आणि १० रु. च्या ३ नोटा आहेत. एकूण रुपये किती ?

१) २६० रुपये

२) २३० रुपये

३) २०० रुपये

४) २५० रुपये


प्रश्न ७) संजयकडे असलेल्या ३० रुपयांमध्ये सर्व नाणी २ रुपयांची आहेत. तर त्याच्याकडे किती नाणी आहेत ?

१) ३०

२) ६०

३) १५

४) २०


प्रश्न ८) १५ रु. ५० पैसे – ८ रु. २५ पैसे = ?

१) ७ रु. ५० पैसे

२) ७ रु. २५ पैसे

३) ८ रु. १५ पैसे

४) ७ रु. ३० पैसे


प्रश्न ९) दीड रुपया = किती पैसे ?

१) १५० पैसे

२) ५० पैसे

३) २५ पैसे

४) २५० पैसे


प्रश्न १०) सीमा १२ रु. दराने ३ वही व २ रु. दराने ५ पेन्सिली घेते. तिला दुकानदाराला किती रुपये द्या

वे लागतील ?

१) ३६ रुपये

२) ४६ रुपये

३) ३४ रुपये

४) ४० रुपये


No comments:

Post a Comment