✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *बुद्धिमत्ता - तर्कसंगती व अनुमान ( नावात बदल)*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
प्रश्न १) पेनला पेन्सिल म्हटले, पेन्सिलला खडू म्हटले, खडूला शाई म्हटले तर फळ्यावर लिहिण्यासाठी शिक्षक काय वापरतील ?
१) खडू
२) पेन्सिल
३) पेन
४) शाई
प्रश्न २) बैलाला म्हैस म्हटले, म्हशीला घोडा म्हटले, घोड्याला शेळी म्हटले तर दूध कोणत्या प्राण्यापासून मिळेल?
१) गाय
२) घोडा
३) म्हैस
४) शेळी
प्रश्न ३) सूर्याला चंद्र म्हटले, चंद्राला तारे म्हटले, तार्यांना ग्रह म्हटले तर पौर्णिमेच्या रात्री प्रकाश कोण देईल ?
१) चंद्र
२) सूर्य
३) तारे
४) ग्रह
प्रश्न ४) भाताला भाकरी म्हटले, भाकरीला भजी म्हटले, भजीला भाजी म्हटले तर खाण्यासाठी तळला जाणारा पदार्थ कोणता ?
१) भजी
२) पोळी
३) भात
४) भाजी
प्रश्न ५) सायकलला बस म्हटले, बसला ट्रेन म्हटले, ट्रेनला रिक्षा म्हटले तर रुळावरून प्रवास करायचा असेल तर कोणत्या वाहनात बसावे लागेल ?
१) ट्रेन
२) बस
३) रिक्षा
४) सायकल
प्रश्न ६) आंब्याला केळे म्हटले, केळ्याला द्राक्ष म्हटले, द्राक्षाला संत्रे म्हटले तर देवगडचा प्रसिद्ध फळ कोणत्या नावाने ओळखला जाईल ?
१) हापूस आंबा
२) केळे
३) द्राक्ष
४) संत्रे
प्रश्न ७) हिरव्या रंगाला लाल म्हटले, लाल रंगाला पिवळा म्हटले, पिवळ्याला निळा म्हटले तर पिकलेली मिरची कोणत्या रंगाची दिसेल ?
१) हिरवी
२) लाल
३) पिवळी
४) निळी
प्रश्न ८) पुस्तकाला वही म्हटले, वहीला वर्तमानपत्र म्हटले, वर्तमानपत्राला मासिक म्हटले तर रोज सकाळी वाचनासाठी काय घेतील ?
१) पुस्तक
२) वही
३) वर्तमानपत्र
४) मासिक
प्रश्न ९) पाण्याला दूध म्हटले, दुधाला ताक म्हटले, ताकाला सरबत म्हटले तर तहान भागवण्यासाठी काय प्यावे लागेल?
१) दूध
२) पाणी
३) सरबत
४) ताक
प्रश्न १०) शाळेला घर म्हटले, घराला बाजार म्हटले, बाजाराला रुग्णालय म्हटले तर
शिकण्यासाठी मुले कुठे जातील?
१) शाळा
२) घर
३) बाजार
४) रुग्णालय

No comments:
Post a Comment