✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *मराठी - म्हणी*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
१) 'आगीतून उठून फुफाट्यात' या म्हणीचा अर्थ निवडा.
१) मोठ्या संकटातून सुटका होणे.
२) लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे.
३) संकट टाळण्यासाठी धाडस करणे.
४) संकटाकडे दुर्लक्ष करणे.
२) 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' या म्हणीचा योग्य अर्थ काय?
१) दुसऱ्याला चुकीचे ठरवणे.
२) सर्वांचे ऐकून शेवटी स्वतःच्या विचाराने वागणे.
३) दुसऱ्याचा सल्ला नेहमी नाकारणे.
४) सर्वांना खूश ठेवण्यासाठी स्वतःला विसरणे.
३) प्रसंग –
शंकर गरजेच्या वेळी मदत करतो, पण फायदा झाला की लोक त्याला विसरतात.
योग्य म्हण निवडा.
१) गरज सरो वैद्य मरो.
२) दाम करी काम.
३) नाव मोठे लक्षण खोटे.
४) गरजवंताला अक्कल नसते.
४) 'करावे तसे भरावे' या म्हणीचा अर्थ निवडा.
१) प्रत्येक कामासाठी पैसा लागतो.
२) वाईट कृत्याचे फळ वाईटच असते.
३) नशिबाने जे घडायचे ते घडते.
४) चांगले काम केले की सुख मिळते.
५) 'दगडापेक्षा वीट मऊ' या म्हणीचा योग्य अर्थ काय?
१) मोठ्या संकटापेक्षा लहान संकट बरे वाटणे.
२) मोठ्या संकटासाठी धीर सोडणे.
३) लहान संकट दुर्लक्षित करणे.
४) लहान माणसाला मोठे मानणे.
६) खालील अर्थावरून योग्य म्हण निवडा –
"कष्टाशिवाय यश मिळत नाही."
१) प्रयत्नांती परमेश्वर.
२) रोज मरे त्याला कोण रडे.
३) देश तसा वेश.
४) नाव मोठे लक्षण खोटे.
७) प्रसंग –
रामकाकांनी खूप गाजावाजा केला, पण काम झालेच नाही.
योग्य म्हण निवडा.
१) गरजवंताला अक्कल नसते.
२) गर्जेल तो पडेल काय?
३) गाव करी ते राव न करी.
४) थेंबे थेंबे तळे साचे.
८) 'तहान लागल्यावर विहीर खणणे' या म्हणीचा अर्थ निवडा.
१) संकट आल्यावर धीर धरणे.
२) गरज भासल्यावर वस्तूची शोधाशोध करणे.
३) आधीच उपाययोजना करणे.
४) दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकणे.
९) 'दुरून डोंगर साजरे' या म्हणीचा अर्थ काय?
१) जवळच्या गोष्टी नेहमी चांगल्या वाटतात.
२) दूरच्या गोष्टी नेहमी मोहक वाटतात, पण जवळ गेल्यावर खरे रूप दिसते.
३) दूर राहिलेल्या व्यक्तीला नेहमी आदर मिळतो.
४) दुसऱ्याचे यश नेहमी मोठे वाटते.
१०) प्रसंग –
मी रोज थोडे थोडे पैसे साठवले. काही महिन्यांनी मोठी रक्कम जमली.
योग्य म्हण निवडा.
१) थेंबे थेंबे तळे साचे.
२) रात्र थोडी सोंगे फार.
३) पाचामुखी परमेश्वर.
४) काकेत कळसा नि गावाला वळसा.

No comments:
Post a Comment