Monday, 22 September 2025

गणित - दिनदर्शिका

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - दिनदर्शिका*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) जर १ जानेवारी २०२५ रोजी बुधवार असेल, तर २६ जानेवारी २०२५ रोजी कोणता वार येईल?

१) शुक्रवार

२) रविवार

३) सोमवार

४) शनिवार


२) खालीलपैकी कोणत्या महिन्यात ३१ दिवस नसतात ?

१) ऑक्टोबर

२) एप्रिल

३) डिसेंबर

४) जुलै


३) एका लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?

१) २८

२) २७

३) २९

४) ३०


४) १० ऑगस्टला मंगळवार असेल तर २४ ऑगस्टला कोणता वार असेल?

१) सोमवार

२) मंगळवार

३) बुधवार

४) गुरुवार


५) खालीलपैकी गटात न बसणारा महिना ओळखा.

१) कार्तिक

२) चैत्र

३) जुलै

४) फाल्गुन


६) २ ऑक्टोबर २०२४ रोजी बुधवार असेल, तर २ नोव्हेंबर २०२४ रोजी कोणता वार असेल?

१) शनिवार

२) रविवार

३) सोमवार

४) गुरुवार


७) जर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन शुक्रवार असेल, तर त्याच वर्षी ५ सप्टेंबर शिक्षकदिन कोणत्या वाराला येईल?

१) सोमवार

२) शुक्रवार

३) रविवार

४) शुक्रवार


८) ३० जून नंतर कोणता दिवस येईल?

१) ३१ जून

२) २ जुलै 

३) ३ जुलै

४) १ जुलै


९) १ मे हा महाराष्ट्र दिन सोमवार असेल तर त्या वर्षी १ ऑक्टोबर ला कोणता वार असेल ?

१) सोमवार

२) बुधवार

३) गुरुवार

४) रविवार


१०) २०२८ या वर्षाची सुरुवात सोमवारने झाली. तर त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाच वेळा

 येणारा वार कोणता ?

१) सोमवार

२) शुक्रवार 

३) बुधवार

४) गुरुवार


No comments:

Post a Comment