Monday, 27 October 2025

मराठी - शुद्ध अशुद्ध वाक्यरचना

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी - शुद्ध अशुद्ध वाक्यरचना*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १ ते ३ साठी सूचना : खालील वाक्यात किती अशुद्ध शब्द आले आहेत ते ओळखा. (योग्य पर्याय निवडा.)

१) माझे वडिल नेहमि सकाळी व्यामाला जातात.

१) एक

२) दोन

३) तीन

४) चार


२) त्या मुलिला शिक्षणाची आथुरता आहे.

१) दोन

२) एक

३) तीन

४) चार


३) शाळेच्या परंगणात मुलं खेळत होती.

१) एक

२) दोन

३) तीन

४) चार


सूचना (प्र. ४ ते ६साठी): खालील वाक्यातील अधोरेखित भागाचा शुद्ध शब्द कोणता?


४) शाळेत स्वच्छतेचे महात्व सर्वांना पटवून दिले जाते.

१) महत्व

२) महत्त्व

३) महत्त्वा

४) महत्वा


५) आपण देशभाक्तीची भावना टिकवून ठेवली पाहिजे.

१) देशभक्तीची

२) देशभाक्तिची

३) देशभाक्तीचा

४) देशभकतीची


६) मुलांनी अत्यत कौतुकाने कार्यक्रम पाहिला.

१) अत्यंन्त

२) अत्यंत

३) अतींत

४) अतियंत


सूचना (प्र. ७ ते १० साठी): खालील वाक्यातील एक भाग चुकीचा आहे, तो भाग पर्यायांमधून निवडा.


७) पाहुण्यांनी / मुलींनी / सांस्कृतिक कार्यक्रमाचे / उद्घाटन केले.

१) शाळेच्या

२) मुलींनी

३) सांस्कृतिक कार्यक्रमाचे

४) उद्घाटन केले


८) विद्यार्थ्यांनी / नीटनेटकं / गृहपाठ / पूर्ण केला.

१) विद्यार्थ्यांनी

२) नीटनेटकं

३) गृहपाठ

४) पूर्ण केला


९) शिक्षकांनी / दररोज / वर्गात / मुलांशी /संवाद साधावा/ खेळतात.

१) शिक्षकांनी

२) रोज

३) वर्गात

४) खेळतात


१०) आवडतात / माझ्या / मित्राला / चविष्ट / आवडतो / आमरस 

१) आवडतो

२) मित्राला

३) चविष्ट

४) आवडतात


No comments:

Post a Comment