Tuesday, 28 October 2025

गणित - क्षेत्रफळ (आयत व चौरस)

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *क्षेत्रफळ - आयत व चौरस*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) ८ सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल?

१) ६४ २) १६ ३) ३२ ४) ८


२) लांबी १२ मी. आणि रुंदी ९ मी. असलेल्या आयताचे परिमिती किती मीटर असेल?

१) ४२ २) ३८ ३) २१ ४) ४८


३) २० मी. लांबी व ५ मी. रुंदी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळाएवढे क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाची बाजू किती मी. असेल?

१) ७ २) ८ ३) १० ४) ५


४) ९ मी. लांबी व ४ मी. रुंदी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळाएवढे क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाची बाजू किती मी. असेल?


१) ५  २) ६  ३) ७  ४) ८


५) १४ मी. लांबी व ९ मी. रुंदी असलेल्या आयताकृती बागेभोवती कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल?

१) ३२ २) ४६ ३) ५६ ४) ६४


६) एका आयताची लांबी २० सेमी आणि रुंदी १० सेमी आहे. त्याच परिमितीचा चौरस काढल्यास त्याची बाजू किती असेल?

१) १२ २) १३.५ ३) १५ ४) १०


७) एका बागेचे क्षेत्रफळ २४० चौ.मी. असून तिची लांबी २० मी. आहे, तर रुंदी किती असेल?

१) १२ २) १० ३) १८ ४) १५


८) एका आयताची लांबी ३० मी. व रुंदी १० मी. आहे. त्या आयताची परिमिती एका चौरसाच्या परिमितीच्या दुप्पट आहे. तर त्या चौरसाची बाजू किती मीटर आहे?

१) २० २) १५ ३) १० ४) २५


९) २० मी. लांबी व १५ मी. रुंदी असलेल्या मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात ५ मी. बाजूचा चौरस काढून टाकल्यास उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती राहील?

१) ३०० २) २७५ ३) २५० ४) २००


१०) एका आयताचे क्षेत्रफळ १२० चौ.मी. आहे. त्याची रुंदी ८ मी. असेल, तर परिमिती किती मीटर असेल?

१) ४४ २) ४६ ३) ४८ ४) ५०


No comments:

Post a Comment