Sunday, 30 November 2025

साप्ताहिक चाचणी क्रमांक 15

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *साप्ताहिक चाचणी क्रमांक 15*

****************************

साप्ताहिक चाचणी क्रमांक 15

विषय - बुद्धिमत्ता 

घटक - शब्दसंग्रह 


१) नाशिक : द्राक्षे :: घोलवड : ?

चिकू

अंजीर

संत्री

सिताफळ


२) वाघाची : डरकाळी :: हत्तीचे : ?

ओरडणे

भुंकणे

चित्कारणे

भुभुःकार


३) मका : कणीस :: कापूस : ?

ओबी

सरकी

लोंबी

बोंड


४) नारळ : खोबरेल तेल :: ऊस : ?

विडा

द्रोण

गोडी

काकवी


५) मध्यप्रदेश : बाफला लापशी :: गुजरात : ?

ढोकळा 

दांडिया

ठेपला

पर्याय १ व 3 बरोबर


६) कवी : कवयित्री :: उंट : ?

उंटणि

घोडी

सांडणी

उंटा


७) सह्याद्री : गोदावरी :: सातपुडा : ?

कावेरी

गंगा

सिंधू

तापी


८) आंबा : फळ :: बटाटा : ?

फळ

फूल

मूळ

खोड


९) भावार्थदीपिका : संत ज्ञानेश्वर :: दासबोध : ?

आचार्य विनोबा भावे

तुकडोजी महाराज

समर्थ सद्‌गुरु

समर्थ रामदास


१०) 50 वर्षे : सुवर्णमहोत्सव :: ? वर्षे : हिरकमहोत्सव

२५

४०

७५

६०


११) झुंबड : उतारूंची :: ? : भक्तांची गर्दी

वृंद

मांदियाळी

झुंबड


१२) अश्व : वारु :: आकाश : ?

पाताळ

कपोल

व्योम

वासव


१३) बेडूक : त्वचा :: मासे : ?

कल्ले

पर

खवले

नाक


१४) सूप : पाखडणे :: तिफन : ?

नांगरणे

चाळणे

पाभार

पेरणे


१५) शिरोपोकळी : मेंदू :: वक्षपोकळी : ?

जठर

यकृत

फुफ्फुस

किडनी


१६) श्वसन : फुप्फुस :: रक्ताभिसरण : ?

रक्त

हृदय

यकृत

मेंदू


१७) तुकडोजी महाराज : राष्ट्रसंत :: शाहू महाराज : ?

पंडित

कर्मवीर

गुरुदेव

राजर्षी


१८) भारत : दिल्ली :: महाराष्ट्र : ?

नागपूर

छत्रपती संभाजी नगर

पुणे

मुंबई


१९) नाशिक : मांडे :: नागपूर : ?

संत्री

उपराजधानी

शेंगदाणा चटणी

संत्राबर्फी


२०) फेब्रुवारी : जून :: ऑगस्ट : ?

नोव्हेंबर

जानेवारी

डिसेंबर

एप्रिल


२१) फूल : पाकळ्या :: शब्द : ?

वाक्ये

अक्षरे

परिच्छेद

विरामचिन्हे


२२) घुबडांचा : घुत्कार :: मधमाशांचा : ?

गुंजारव

कलरव

भुणभुण

घुमणे


२३) ना. धो. महानोर : रानकवी :: गोविंदाग्रज : ?

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

राम गणेश गडकरी

चिंतामण त्र्यंबक खानोलकर

कृष्णाजी केशव दामले


२४) कृष्णा : महाबळेश्वर :: गोदावरी : ?

त्र्यंबकेश्वर

जायकवाडी

नाशिक

सातारा


२५) एप्रिल : नोव्हेंबर :: मार्च : ?

फेब्रुवारी

जून

ऑगस्ट

सप्टेंबर

No comments:

Post a Comment