✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *संवादावर आधारित प्रश्न*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
खालील संवाद वाचा अचूक पर्याय निवडून त्याचे वर्तुळ रंगवा.
"अरे हे काय? माझी बकरी कुठे नेताय? सोडा तिला," असे म्हणत केळीवाला धावत आला.
"बकरीला माझ्या घरी नेतोय," सुधाकर म्हणाला.
"बकरीने न सांगता आमच्या केळ्यांच्या साली खाल्ल्या आणि त्याचे पैसे तुम्ही आमच्याकडून घेतलेत. बकरीच्या पोटातल्या साली आम्हाला काढून घ्यायच्या आहेत," असे म्हणत सुधाकर बकरीला घेऊन निघाला.
प्र.२) वरील संवादात कितीजण सहभागी झाले आहेत?
१) एक
२) तीन
३) दोन
४) चार
प्र.१) बकरी कोणाच्या मालकीची आहे?
१) सुधाकर
२) केळीवाला
३) दिनकर
४) फेरीवाला
प्र.३) केळ्यांच्या साली कोणी खाल्ल्या?
१) सुधाकर
२) केळीवाला
३) बकरी
४) दिनकर
प्र.५) सुधाकरने बकरीबाबत काय सांगितले?
१) बकरी हरवली
२) बकरी आजारी आहे
३) बकरीला घरी नेतोय
४) बकरी विकत घेतली आहे
५) उताऱ्यातील कोणते वाक्य परिस्थितीतील विनोद दाखवते?
१) “बकरीला माझ्या घरी नेतोय.”
२) “बकरी कुठे नेताय?”
३) “बकरीनेही न सांगता आमच्या केळ्यांच्या साली खाल्ल्या.”
४) “सोडा तिला.”

No comments:
Post a Comment