Tuesday, 25 November 2025

इयत्ता दुसरी: मराठी -शब्दाच्या जाती (नाम)

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *शब्दाच्या जाती (नाम)*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्र.१) खालील वाक्यातील नाम ओळखून योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

बालकांनी बागेत सुंदर फुले गोळा केली.

१) सुंदर

२) फुले

३) गोळा

४) केली


प्र.२) खालील गटातील नाम नसणारा शब्द ओळखा.

१) नदी

२) डोंगर

३) सुंदर

४) तलाव


प्र.३) खालील वाक्यात किती नामे आहेत?

कावळा घरट्यात आपल्या पिलांना खाऊ घालत होता.

१) ३

२) ४

३) २

४) १


प्र.४) खालील वाक्यातील योग्य नाम निवडा.

रामने गावात नवे घर बांधले.

१) नवे

२) नवीन

३) बांधले

४) राम


प्र.५) खालील वाक्यातील नामांची संख्या शोधा.

शाळेच्या मैदानात मुलं फुग्यांसोबत खेळत होती.

१) ४

२) ३

३) २

४) १

No comments:

Post a Comment