✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *शब्दाच्या जाती (क्रियापद)*
****************************
प्र.१) खालील वाक्य पूर्ण करा व योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा.
चिमणी झाडावर घरटे
१) खातो
२) विणते
३) बसतो
४) खेळतो
प्र.२) खालील वाक्यातील क्रियापद ओळखा व योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा.
राधा शांतपणे पुस्तक वाचत बसली होती.
१) पुस्तक
२) शांतपणे
३) वाचत, बसली
४) राधा
प्र.३) रिकामी जागा पूर्ण करा.
बाबा मला शाळेत सायकलवरून
१) नेतात
२) खातात
३) येतात
४) रंगवतात
प्र.४) खालील वाक्यात किती क्रियापदे आहेत?
गोलू उडी मारून टोपलीत जाऊन बसला.
१) १
२) ३
३) २
४) ४
प्र.५) योग्य क्रियापद ओळखा.
१) लाल
२) वेगाने
३) धावत
४) घर

No comments:
Post a Comment