Monday, 15 December 2025

साप्ताहिक चाचणी क्रमांक 17 प्रश्नावली

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *साप्ताहिक चाचणी क्रमांक 17 प्रश्नावली*

****************************

१) शाळा सुटली आहे. अचानक पाऊस सुरू झाला. एका वर्गमित्राजवळ छत्री नाही. तेव्हा तुम्ही
१) पाहून न पाहिल्यासारखे कराल
२) त्याला पुन्हा येण्यास सांगाल
३) त्याला छत्रीमध्ये घ्याल
४) त्याच्या घरी जाऊन सांगाल

२) सहलीला गेल्यानंतर तेथील वास्तूवर तुमचा मित्र लिहीत आहे. अशावेळी तुम्ही
१) त्याला मदत कराल
२) त्याचे नाव शिक्षकांना सांगाल
३) त्याला माराल
४) त्या वास्तूचे जतन करण्याविषयी समजावून सांगाल

३) प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा स्वच्छ करायची आहे. त्यात तुमचा सहभाग
१) असणार नाही
२) असणार
३) थोडा वेळ असणार
४) कधी कधी असणार

४) घरकामात मदत आवश्यक आहे. तेव्हा तुमची भूमिका काय असेल
१) मदत करणार नाही
२) मदत कराल
३) खेळायला जाणार
४) अभ्यास आहे असे म्हणाल

५) तुम्ही रस्त्याने जात आहात. वाटेत केळीची साल दिसली. तर तुमची भूमिका काय असेल
१) पाहून न पाहिल्यासारखे कराल
२) साल कचरापेटीत टाकाल
३) रस्त्याच्या मध्यभागी टाकाल
४) साल घेऊन खेळत घरापर्यंत न्याल

६) स्वातंत्र्यदिनानिमित्त वर्ग सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. तेव्हा
१) आमचा वर्ग पहिला येण्यासाठी प्रयत्न कराल
२) सहभागी होणार नाही
३) कागद गोळा करून वर्गात टाकाल
४) मित्राकडून कामे करून घ्याल

७) शाळेची सहल शिवनेरी गडावर गेली आहे. त्यावेळी तुमची योग्य कृती
१) मित्रांसोबत भांडण कराल
२) निरीक्षण करून नोंदी कराल
३) मोबाईल पाहत गड चढाल
४) तेथील वास्तूवर आपले नाव कोराल

८) हस्तकलेच्या तासात सर्वत्र कागद पसरले आहेत. तेव्हा
१) त्याकडे दुर्लक्ष कराल
२) कागद उचलून मैदानावर टाकाल
३) कागदासोबत खेळत बसाल
४) कागद गोळा करून कचरापेटीत टाकाल

९) एखादी विदेशी व्यक्ती भारताबद्दल प्रेम दाखवत आहे. तेव्हा तुम्ही
१) काहीही बोलणार नाही
२) लक्ष देणार नाही
३) आपल्या देशाबद्दल अधिक माहिती सांगाल
४) यापैकी काहीही नाही

१०) तुमच्या वर्गात परप्रांतातील एक नवीन विद्यार्थी आला आहे. तेव्हा तुम्ही
१) त्याच्याशी बोलणार नाही
२) त्याच्याकडे वाईट नजरेने पाहाल
३) त्याच्याकडे आपुलकीने पाहाल
४) त्याच्याकडे आदराने पाहाल

११) शिक्षक वह्या तपासत आहेत आणि तुम्ही गृहपाठ केला नाही. तेव्हा तुम्ही
१) शाळेतून घराकडे पळून जाल
२) चूक कबूल कराल
३) काहीतरी कारणे सांगाल
४) सरांनी सांगितलेच नाही असे म्हणाल

१२) क्रिकेटचा सामना तुमच्या संघाने गमावला. तेव्हा तुम्ही
१) प्रतिसंघाला चिडवाल
२) दुसऱ्या संघाचे अभिनंदन कराल
३) चिडून तेथून निघून जाल
४) यापैकी नाही

१३) तुमच्या मित्राचा शर्ट फाटला आहे. तेव्हा तुम्ही
१) आणखी फाडाल
२) नवीन घेण्यास सांगाल
३) स्वतः शिवण्यास शिकवाल
४) शिवून घेण्यास सांगाल

१४) धावण्याच्या शर्यतीत सीता पहिली व गोपाळ दुसरा आला. तेव्हा गोपाळने सीताचे
१) शत्रुत्व पत्करावे
२) भांडण करावे
३) अभिनंदन करावे
४) यापैकी नाही

१५) तुमची मैत्रीण आजारी आहे असे समजले. तेव्हा तुम्ही
१) भेटायला जाल
२) टाळाटाळ कराल
३) आनंदी व्हाल
४) यापैकी नाही

१६) स्त्री-पुरुष यांची चित्रे बालभारतीमध्ये का दिली जातात
१) स्त्री श्रेष्ठ म्हणून
२) पुरुष श्रेष्ठ म्हणून
३) पुरुषांची संख्या कमी व्हावी म्हणून
४) स्त्री-पुरुष दोघांनाही समान वागणूक मिळावी म्हणून

१७) घरात टी.व्ही. घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. तेव्हा तुमची योग्य कृती
१) वडिलांच्या इच्छेवर टी.व्ही. घेणे
२) आईच्या इच्छेवर टी.व्ही. घेणे
३) मोठ्या बहिणीच्या इच्छेवर टी.व्ही. घेणे
४) स्वतःचे मत नम्रपणे मांडणे

१८) आपल्या देशात विविध धर्म आहेत कारण
१) आपला देश महान आहे
२) आपला देश सर्वधर्म सहिष्णु आहे
३) काही धर्मांनाच मान्यता आहे
४) यापैकी नाही

१९) मोठ्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही
१) तुच्छतेने बोलाल
२) आदराने बोलाल
३) आरे-तुरे म्हणाल
४) यापैकी नाही

२०) वर्गातील एक मित्र दररोज चोरी करतो. तेव्हा तुम्ही
१) प्रत्येकाने वेगवेगळे समजावून सांगाल
२) एकजुटीने त्याला समजावून सांगाल
३) सर्वजण मिळून शिक्षा कराल
४) यापैकी नाही

२१) भूकंपग्रस्तांना मदतीचे काम दिले आहे. तेव्हा
१) जोमाने मदत कराल
२) दुर्लक्ष कराल
३) दुसऱ्यांना काम करण्यास सांगाल
४) मदत करू नका असे सांगाल

२२) जत्रेमध्ये एक मुलगा हरवला आहे. त्याची आई शोध घेत आहे. तेव्हा
१) दुर्लक्ष कराल
२) आईला खायला नेऊन द्याल
३) मुलाला शोधण्यात मदत कराल
४) घरी जाऊन आई-वडिलांना सांगाल

२३) कॉलनीत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तेव्हा
१) स्वतः रक्तदान न करता इतरांना सांगाल
२) शिबिरात जाणार नाही
३) रक्तदान करणाऱ्यांना घाबरवाल
४) स्वतः रक्तदान करून सहभाग नोंदवाल

२४) शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आहे. तेव्हा
१) कार्यक्रमात सहभागी होऊन मदत कराल
२) मित्रांनाही सहभागी होण्यास सांगाल
३) फक्त पुढे पुढे राहाल
४) उणिवा शोधत बसाल

२५) नाटकासाठी तिकिटांची लांब रांग आहे. तेव्हा तुम्ही
१) रांगेतील लोकांशी वाद घालाल
२) रांग सोडून पुढे जाल
३) तिकीट न काढता निघून जाल
४) रांगेत उभे राहूनच तिकीट काढाल

1 comment: