Monday, 15 December 2025

इयत्ता : चौथी - मराठी : एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे

 ⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *इयत्ता : चौथी - मराठी : एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे*

****************************

प्र. 1. कर्णाने कर्णातील कर्णभूषणे दान केली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

1) कान

2) डूल

3) काटकोनासमोरील बाजू

4) महाभारतातील योद्घा


प्र. 2. ऊसतोड संपल्यानंतर साखर कारखान्याची चिमणी बंद झाली. या वाक्यातील चिमणी या अधोरेखित शब्दाचा अभिप्रेत अर्थ पुढीलपैकी कोणता ?

1) एक पक्षी

2) जुन्या काळातील दिवा

3) थवा

4) धुराडे


प्र. 3. कातरवेळी आजीला खूप गहिवरून आले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अचूक अर्थ कोणता ?

1) पहाटेची वेळ

2) दुपारची वेळ

3) सकाळची वेळ

4) सूर्य मावळल्यानंतरची वेळ


प्र. 4. 'घोव' या शब्दाचा पुढीलपैकी कोणता अर्थ नाही ?

1) पती

2) पत्नी

3) नवरा

4) भ्रतार


प्र. 5. यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळे घरात धान्यांची रेलचेल झाली आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा पुढीलपैकी कोणता अर्थ नाही?

1) समृद्धी

2) पुष्कळ

3) कमी-जास्त

4) विपुलता


प्र. 6. मेंढपाळांनी गावच्या मोकळ्या मैदानात पालं टाकली या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ कोणता ?

1) सरपटणारा प्राणी

2) झोपडी

3) घर

4) राहुटी


प्र. 7. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आमच्या घरातील सर्व लोक माजघरात बसून चर्चा करतात. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ कोणता ?

1) घराचे पहिले दालन

2) वरचा माळा

3) तळघर

4) घराचे मधले दालन


प्र. 8. खालील पर्यायामध्ये 'कळ' या शब्दाचा कोणता अर्थ आलेला नाही ?

1) बटण

2) वेदना

3) गुप्त किल्ली

4) वळा


प्र. 9. मित्रांच्या भांडणामध्ये अजयने विजयची वादातील बाजू घेतली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता ?


1) पक्ष

2) पंधरवडा

3) राजकीय संघटन

4) भांडण


प्र. 10. खालील पर्यायामध्ये 'ओढा' या शब्दाचा कोणता अर्थ अभिप्रेत नाही?

1) आकर्षण

2) पाण्याचा ओघ

3) वजन ओढणे

4) मनाचा कल


No comments:

Post a Comment