Tuesday, 30 September 2025

गणित - कोन व कोनाचे प्रकार

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - कोन व कोनाचे प्रकार*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) एका त्रिकोणात एक लघुकोन, एक काटकोन असेल तर तिसरा कोन कोणता असेल ?

१) लघुकोन

२) काटकोन

३) विशालकोन

४) सरळकोन


प्रश्न २) काटकोनाचे माप किती असते?

१) ३०°

२) ४५°

३) ९०°

४) १८०°


प्रश्न ३) एका सरळ रेषेत तयार होणारा कोन किती अंशांचा असतो?

१) ९०°

२) १८०°

३) २७०°

४) ३६०°


प्रश्न ४) ६०° मापाचा कोन कोणत्या प्रकारात मोडतो?

१) काटकोन

२) लघुकोन

३) विशालकोन

४) सरळकोन


प्रश्न ५) घड्याळात ३ वाजले असता काट्यांमध्ये कोणता कोन तयार होतो?

१) काटकोन

२) लघुकोन

३) विशालकोन

४) सरळकोन


प्रश्न ६) चौकोनाच्या सर्व कोनांचे मापांची बेरीज किती असते?

१) ९०°

२) १८०°

३) ४५°

४) ३६०°


प्रश्न ७) ८९° मापाचा कोन कोणत्या प्रकारचा आहे?

१) काटकोन

२) सरळकोन

३) लघुकोन

४) विशालकोन


प्रश्न ८) ९१° मापाचा कोन म्हणजे —

१) काटकोन

२) सरळकोन

३) लघुकोन

४) विशालकोन


प्रश्न ९) त्रिकोणातील सर्व कोनांची बेरीज किती असते?

१) १८०°

२) ३६०°

३) ९०°

४) २७०°


प्रश्न १०) लघुकोनाचे माप जास्तीत जास्त किती असू शकते ?

१) ९०

२) १८०

३) ९१

४) ८९


No comments:

Post a Comment