Tuesday, 19 August 2025

बेरीज वजाबाकी मिश्र उदाहरणावर आधारित गेम खेळा.

गणित प्रश्नपत्रिका गेम — उत्सवासह

गणित प्रश्नपत्रिका गेम

१) सीमाने १५२५ रुपयांचे कपडे, ८७५ रुपयांच्या चपला व ५५० रुपयाची बॅग खरेदी केली. तिने दुकानदारास ३००० रुपये दिले. तर दुकानदाराने तिला किती रुपये परत देईल?
२) एका गावाची एकूण लोकसंख्या १५७८० आहे. त्यापैकी ९७६० लोक मतदार आहेत. तर मतदार नसलेले किती लोक आहेत?
३) आनंदने ३२५० रुपयांचा मोबाईल, ४५० रुपयांचे कव्हर व ३०० रुपयांचे हेडफोन खरेदी केले. दुकानदाराने २५० रुपयांची सूट दिली. तर आनंदने किती रुपये दिले?
४) एका शाळेत ४८५ विद्यार्थी होते. त्यापैकी ७५ विद्यार्थी शैक्षणिक सहलीला गेले नाहीत. तर किती विद्यार्थी सहलीला गेले?
५) मंगेशचा महिन्याचा पगार १५००० रुपये आहे. त्यापैकी ३५०० रुपये घरभाडे, २५०० रुपये किराणा खर्च व १५०० रुपये प्रवास खर्च झाला. उरलेली रक्कम त्याने बचत केली. तर त्याची बचत किती?
६) गेल्या वर्षी शाळेत २८६५ विद्यार्थी होते. यावर्षी ३२५ नवीन विद्यार्थी आले व १८० विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेले. तर यावर्षी शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
७) एका ग्रंथालयात विज्ञान विषयाची ४७०, गणित विषयाची ३५६ व समाजशास्त्र विषयाची ५२९ पुस्तके आहेत. तर एकूण किती पुस्तके आहेत?
८) एका शेतकऱ्याकडे ६४० आंबे होते. त्याने ४२५ आंबे विकले, ७५ आंबे शेजाऱ्यांना दिले. तर आता त्याच्याकडे किती आंबे उरले?
९) एका गावात ९५१ घरांपैकी ३२७ घरांना गॅस कनेक्शन नाही. तर गॅस कनेक्शन असलेली घरे किती?
१०) एका पुस्तकांच्या दुकानात ७६८ पुस्तके होती. सकाळी ४२९ पुस्तके विकली व दुपारी १९५ पुस्तके परत आणली. तर दुकानात आता किती पुस्तके आहेत?
टीप: ५०% पेक्षा अधिक गुण मिळवले तर उत्सव चालेल. आपण सर्व प्रश्न न निवडल्यास त्रुटी दिसेल.

4 comments: